शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: झुकेंगे नहीं! युक्रेनच्या सैनिकांचा शरणागतीस नकार; लढत राहण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:24 IST

रशिया मारियुपोलवर कब्जा करण्यासाठी आणखी जोरदार हल्ले करण्याची शक्यता

कीव्ह : मारियुपोलमध्ये युक्रेनच्या सैनिकांनी रशियाला शरण येण्यास नकार दिला असून, यापुढेही लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांना शरणागती पत्करण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपल्याने आता रशिया मारियुपोलवर कब्जा करण्यासाठी आणखी जोरदार हल्ले करण्याची शक्यता आहे. कीव्ह येथील एका मॉलवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सहाजण ठार झाले आहेत.या युद्धाच्या २६व्या दिवशी रशियाने कीव्ह, मारियुपोल आदी शहरांवर आणखी तीव्र हल्ले चढवले. मारियुपोलमध्ये युक्रेनचे सैनिक शरण आल्यास त्यांना सुरक्षितपणे शहराच्या बाहेर जाऊ देण्यात येईल, असा रशियाने मांडलेला प्रस्ताव युक्रेनने धुडकावून लावला. रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये मारियुपोल शहराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेकडो लोकांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे.  त्या देशातील अझोव्ह या शहरात एका शाळेच्या इमारतीमध्ये ४०० नागरिकांनी आश्रय घेतला आहे. त्या शाळेवरही बॉम्बचा मारा करण्यात आला. या हल्ल्याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी तीव्र निषेध केला आहे.सुमीमध्ये अमोनियाची गळतीरशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या सुमी शहरात एका रासायनिक प्रकल्पातून अमोनिया वायूची गळती झाली. त्यामुळे या कारखान्यापासून २.५ किलोमीटरच्या परिसरात वायू प्रदूषणात वाढ झाली. अमोनिया वायूची गळती नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली, ते अद्याप समजू शकलेले नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया