शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: आम्ही शेवटपर्यंत...; युक्रेनच्या अध्यक्षांचा पवित्रा अचानक बदलला, युद्ध आणखी पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:28 IST

Russia vs Ukraine War: युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांचा सूर अचानक बदलला; युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या महत्त्वाच्या शहरांवर हल्ले सुरू आहेत. मात्र युक्रेन हार मानायला तयार नाही. बलाढ्य रशियन फौजांसमोर युक्रेनी सैनिक जीवाची बाजी लावून लढत आहेत. युद्ध सुरू होऊन दोन आठवडे होत असताना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी काहीसा मवाळ पवित्रा घेतला. नाटोमध्ये जाण्यास स्वारस्य नसल्याचं जेलेन्स्की म्हणाले. त्यानंतर युद्ध संपेल अशी शक्यता निर्माण झाली. मात्र जेलेन्स्की यांनी त्यांचा पवित्रा अचानक बदलला आहे.आम्ही शरणागती पत्करणार नाही. रशियन सैनिकांनी आपल्या मायदेशी निघून जावं. आम्ही आमच्या देशासाठी लढत राहू, असं म्हणत जेलेन्स्की यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता रशियन सैनिकांना शरणागती पत्करावी लागेल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेन सोडावं लागेल. कारण युक्रेनी सैन्य देशासाठी शेवटपर्यंत लढणार आहे, अशा शब्दांत जेलेन्स्की यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काही तासांपूर्वीच जेलेन्स्की यांनी रशियासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मात्र आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. युक्रेन सैन्यानं शरणागती पत्करल्यावरच युद्ध थांबेल, अशी अट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आधीपासूनच घातली आहे. मात्र युक्रेनचं सैन्य गुडघे टेकणार नसल्याचं जेलेन्स्की यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुतीन नरमलेयुक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेन सरकार उखडून फेकून द्यावं असा आमचा उद्देश नाही, असं पुतीन यांनी म्हटलं आहे. युक्रेनसोबतची चर्चा आता पुढच्या टप्प्यात पोहोचली असल्याचंही याआधी रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. आता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया