शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: धक्कादायक! युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन अब्जाधीशावर विषप्रयोग; कटामागे नेमकं कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:51 IST

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन उद्योगपतीवर विषप्रयोग; दिसू लागली विचित्र लक्षणं

कीव्ह: युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये पेटलेलं युद्ध महिन्याभरानंतरही सुरूच आहे. आतापर्यंत अनेकदा दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. यानंतर आता युक्रेनमध्ये वेगळ्याच घटना घडू लागल्या आहेत. युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच मार्चच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेले होते. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचा ते भाग होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांवर विष हल्ला झाला. अब्रामोविच रशियन नागरिक आहेत. यांच्यासह तिघांमध्ये अजब लक्षणं दिसून आली. त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. डोळे लाल झाले. हाताची त्वचा निघून जाऊ लागली. वॉल स्ट्रिट जर्नलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ३ मार्चला रोमन अब्रामोविच यांच्यासह तिघांना बैठकीनंतर विष देण्यात आलं. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबावं. शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अब्रामोविच प्रयत्नशील होते. 

बैठकीला अब्रामोविच यांच्यासह आणखी एक रशियन उद्योगपती आणि युक्रेनचे खासदार उमेरोव उपस्थित होते. रात्री १० पर्यंत बैठक सुरू होती. त्यानंतर त्यांच्या शरीरात काही लक्षणं दिसू लागली. रासायनिक हत्यारांच्या माध्यमातून विष दिल्यानंतर दिसणारी लक्षणं त्यांना जाणवू लागली. 

बैठकीत सहभागी झालेल्या तिघांनी मॉस्कोतील कट्टरतावाद्यांवर केमिकल हल्ल्याचा आरोप केला. युक्रेनविरुद्ध सुरू असलेलं युद्ध थांबावं असं रशियातल्या कट्टरतावाद्यांना वाटत नाही. त्यामुळेच शांततेसाठी सुरू असलेला संवाद अयशस्वी करण्याचा प्रयत्न या गटानं केला. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया