शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Russia Victory Day: '1945 प्रमाणे आताही आमचा विजय होणार', व्लादिमीर पुतिन यांचे यूक्रेनसह 15 देशांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 09:48 IST

Russia Victory Day: रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो. या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.

Russia Victory Day:रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात एकीकडे रशियाने युक्रेनमधील जवळपास सर्व शहरे उद्ध्वस्त केली आहेत, तर दुसरीकडे रशियामध्ये विजय दिनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. रशिया दरवर्षी दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनीचा पराभव साजरा करतो.

या खास प्रसंगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 15 देशांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. या देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे. संदेशात लिहिले आहे- 1945 प्रमाणे विजय आमचाच असेल. संदेशात पुतिन यांनी आपल्या सैन्याचे कौतुक केले आणि म्हटले की, 'पूर्वजांप्रमाणे आमचे सैनिकही मातृभूमीला नाझींपासून मुक्त करण्यासाठी लढत आहेत. आज नाझीवाद रोखणे हे आपले कर्तव्य आहे." 

युक्रेनसह या देशांना संदेश पाठवलारशियामध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही या विशेष सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. माजी सैनिक युद्धाशी संबंधित स्मारकांवर पुष्पांजली अर्पण करतात. रशियातील दुसरे महायुद्ध हे महान देशभक्त युद्ध म्हणून ओळखले जाते. रशियाने अझरबैजान, आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, मोल्दोव्हा, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, अबखाझिया, दक्षिण ओसेशिया, डीपीआर, एलपीआर आणि जॉर्जिया येथील लोकांना संदेश पाठवले आहेत. या देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाGermanyजर्मनी