शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Russia war: युक्रेनला नो फ्लाय झोन बनवण्यास नकार; झेलेंस्कींनी NATO ला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 10:03 IST

युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia Ukrain War) सुरू होऊन आता नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याचे युक्रेनच्या विविध शहरांमध्ये सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे. तसं न करता आता पाश्चात्य लष्करी आघाडीने रशियन हल्ल्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

रशिया हल्ले सुरू करेल आणि त्यात लोकांचा मृत्यू होईल हे माहित असूनही नाटोने युक्रेनवरील उड्डाणे बंद करण्याचा निर्णय जाणूनबुजून घेतला नाही. युक्रेनियन शहरे आणि गावांवर आणखी रशियन बॉम्बहल्ला करण्यासाठी नाटोने ग्रीन सिग्नल दिला असल्याचं शुक्रावारी एका व्हिडीओद्वारे झेलेंन्स्की यांनी सांगितलं.

यापूर्वी शुक्रवारी, नाटोने रशियाकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी नो-फ्लाय झोन सुरू करण्याची युक्रेनची विनंती नाकारली. मात्र, पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध न थांबविल्यास त्यांच्यावर नवीन निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे. लष्करी आघाडी युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन' लागू करणार नाही. अशा निर्णयामुळे अण्वस्त्र असलेल्या रशियासोबत युरोपात एक मोठं युद्ध सुरू होऊ शकतं. यामध्ये अनेक देश सामील होतील आणि मोठी समस्या निर्माण होईल, असं नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले.

अमेरिकेकडूनही नाटोची बाजूअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही नाटोची बाजू घेतली आणि युक्रेनवर नो-फ्लाय झोनची मागणी नाकारली. नो-फ्लाय झोन म्हणजे रशियन विमाने पाडण्यासाठी नाटोची विमानं युक्रेनियन हवाई क्षेत्रात पाठवावी लागतील. यामुळे युरोपमध्ये भयंकर युद्ध होऊ शकतं, असं ते म्हणाले. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिका