शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: 'आम्हाला विमाने द्या...अन्यथा जमिनीवर रक्तपात वाढेल', युक्रेनची पाश्चिमात्य देशांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 08:37 IST

Russia Ukraine War: ''मागील 10 दिवसां 10,000 रशियन सैनिक मारले''-युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

कीव: मागील दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे युद्धासाठी शस्त्रे पुरवण्याणी विनंती केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Volodymyr Zelenskyy) यांनी शनिवारी पाश्चात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास जमिनीवर रक्तपात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

युक्रेनला मदतीची गरजयूएस सिनेटचे नेते चक शूमर यांनी सांगितले की, झेलेन्स्की यांनी शनिवारी यूएस सिनेटर्सशी बोलताना विशेष आवाहन केले. "रशियाला हरवण्यासाठी युक्रेनला रशियन बनावटीच्या विमानांची नितांत गरज आहे. मी त्यांचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेन,"असेही शुमर यांनी निवेदनात म्हटले. 

रशियाने मनोरुग्णालय ताब्यात घेतलेदरम्यान, रशियन सैन्याने युक्रेनच्या कीव प्रदेशातील बोरोडांका शहरातील एक मनोरुग्णालय ताब्यात घेतले आहे. त्या रुग्णालयात 670 रुग्ण असल्याची माहिती आहे. प्रादेशिक गव्हर्नर ओलेक्सी कुलेबा म्हणाले, ''या लोकांना कसे बाहेर काढायचे, त्यांना कशी मदत करायची हे आम्हाला समजत नाहीये. त्यांना पाणी आणि औषधांची सतत गरज असते. हे विशेष गरजा असलेले लोक आहेत, त्यांना सतत मदतीची गरज असते. त्यांच्यापैकी बरेच जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून आहेत.''

झेलेन्स्कीचा दावा- 10,000 रशियन सैनिक मारलेयातच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी दावा केला की, युक्रेनियन सैन्याने देशाच्या मध्य आणि आग्नेय भागातील प्रमुख शहरांवर नियंत्रण ठेवले आहे. तसेच, 10 दिवसांच्या युद्धात 10,000 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही ते करत आहेत. रशियाकडून जीवितहानीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सामायिक केलेली नाही. रशियन सैन्य सध्या खारकीव्ह, निकोलायव्ह, चेर्निहाइव्ह आणि सुमी यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया