शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Russia Ukraine War : रशियातील श्रीमंत आणि पुतिन यांच्या अब्जाधीश मित्रांवर अमेरिकेची कारवाई; संपत्ती फ्रीज, बिझनेसवरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 09:05 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी युक्रेनच्या (Ukraine) समर्थनार्थ रशियावर (Russia) निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी युक्रेनच्या (Ukraine) समर्थनार्थ रशियावर (Russia) निर्बंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी, आपल्या नवीन निर्बंधांमध्ये, अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर दबाव आणण्यासाठी प्रेस सेक्रेटरी पेस्कोव्ह यांच्यासह १९ रशियन दिग्गज आणि त्यांच्याशी संबंधित ५० लोकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. हे सर्वजण पुतिन यांचे खास मानले जातात.

रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अलीशेर बुर्हानोविच उस्मानोव्ह, तसंच १९ रशियन उच्चभ्रू व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील लोक, तसंच जवळच्या सहकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लादले असल्याची माहिती न्यूज एजन्सी एएफपीनं दिली. व्हिसा निर्बंधांनंतर आता त्यांन अमेरिकेला जाता येणार नाही. याशिवाय अमेरिकेने विमान कारखाने Irkutsk आणि Aviastar या विमान कारखान्यांसह अनेक रशियन विमान उत्पादक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंत्रिमंडळ आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या निर्बंधांचा उल्लेख केला. तसंच तसंच आपलं ध्येय रशियावर अधिक दबाव टाकणं आणि अमेरिका, तसंच सहकारी देशांना होणारं नुकसान कमी करणं हेच असल्याचं त्यांनी नमूद केलं. या निर्णयामुळे रशियातील व्यवसायिक आणि त्यांचे कुटुंबीय अमेरिकन आर्थिक प्रणालीपासून दूर होतील असं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलं. त्यांची अमेरिकेतील संपत्ती फ्रीज करण्यात आली असून त्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.प्रवक्ते पेस्कोव्ह यांच्यावर निर्बंधअमेरिकेने रशियन संरक्षण मंत्रालया क्रेमलिनचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांच्यावर निर्बंध लादले आहेत. तर दुसरीकडे रशियन दिग्गज उद्योगपती उस्मानोव्ह आणि इतरांच्या संपत्तीचा अमेरिका आणि अमेरिकन लोकांद्वारे वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तेत सुपरयॉटचा समावेश आहे. तसंच ही जगातील सर्वात मोठी क्रूझ आहे, परंतु ती जर्मनीने नुकतीच जप्त केली होती. रशियाच्या सर्वात मोठ्या खासगी मालकीच्या विमानांपैकी एक असलेल्या उस्मानोव्हच्या खासगी जेटचाही या निर्बंधांमध्ये समावेश आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन