शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 10:45 IST

Russia Ukraine War Updates: रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर शुक्रवारी रात्रभर बॉम्बफेक सुरु ठेवली होती. यामध्ये नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात येत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. रशिया एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन हल्ले करू लागला आहे की, नागरिकांच्या घरांवरही मिसाईल, रॉकेट डागली जात आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांचाही मृत्यू होत आहे. रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर शुक्रवारी रात्रभर बॉम्बफेक सुरु ठेवली होती. यामध्ये युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेट्स (Oksana Shvets) यांचा मृत्यू झाला आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. 

रशियाने किव्हवर डागलेल्या रॉकेटमुळे त्यांचा मृत्यू झाला. ओक्साना यांच्या निधनाची माहिती Young Theatre Community ने दिली आहे. ओक्साना यांनी युक्रेनी रंगभूमीसाठी बरीच वर्षे काम केले. थिएटर कम्युनिटीने याची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे. 

आपल्या भूमीवर असलेल्या शत्रूला माफी नाही, निवासी इमारतीवर रशियन रॉकेट हल्ल्यात ओक्साना श्वेट्सचा मृत्यू झाला आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. ओक्साना श्वेट्स या युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचा अभिनय लोकांना खूप आवडायचा. इतकंच नाही तर त्यांना युक्रेनचा कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने देखील  सन्मानित करण्यात आले होते.

ओक्साना श्वेट्सपूर्वी, प्रसिद्ध युक्रेनियन चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार ब्रेंट रेनॉड यांचा मृत्यू झाला होता. युक्रेनमधील इरपिन शहरावर रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात ब्रेंटची कार आल्याचे सांगण्यात आले. एएफपीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात ब्रेंटचा मृत्यू झाला. त्याच्यासोबतचा आणखी एक पत्रकार जुआन अरेडोंडो याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघेही युक्रेनच्या निर्वासितांचा अहवाल तयार करत होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया