शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

Russia Ukraine War : हृदयद्रावक! आजारी आईला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या महिलेवर रशियन सैनिकांनी झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 15:28 IST

Russia Ukraine War : आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद आता आणखी चिघळला आहे. याच दरम्यान युद्ध पेटलेलं असताना मन हेलावून टाकणारी एक घटना आता समोर आली आहे. आईच्या औषधासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर रशियन सैनिकांनी गोळ्या झाडल्याची भयंकर घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये महिलेसह तिच्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

द मिररच्या रिपोर्टनुसार, वेलेरिया मक्सेत्स्का असं या महिलेचं नाव असून त्या आपल्या आईसोबत कीव्ह येथील रस्त्यावर थांबली होती. त्याचवेळी रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. वेलेरियाची आई खूप आजारी होती. त्यामुळे त्यांनी रुग्णालयात घेऊन जाऊन औषधं आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या पण त्याच दरम्यान रशियन सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

औषधासाठी घराबाहेर पडलेल्या माय-लेकींवर गोळीबार

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वेलेरिया यांनी युक्रेन सोडून जाण्यास नकार दिला होता. वेलेरिया यांनी देशवासियांना मदत करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कीव्हमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वेलेरिया यांच्या आईचे औषध संपले होते. औषधाच्या शोधात असताना त्यांच्यासमोर रशियन सैनिकांचा ताफा आला. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात वेलेरिया यांच्यासोबतच त्यांची आई आणि वाहनचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बाईकवर 2400 किमीचा प्रवास करून युक्रेनमध्ये माजी सैनिकाने पोहचवली औषधं

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या बाईकने 48 तास 2414 किलोमीटरचा प्रवास करून मोलाचं काम केलं आहे. युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लियोन क्रिब असं या व्य़क्तीचं नाव असून त्याने ब्रिटनमधील वेस्ट ससेक्सच्या चेस्टरमधून आपल्या जुन्या बाईकने प्रवास सुरू केला. लियोनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि पोलंडचा प्रवास केला. त्यानंतर औषधं घेऊन युक्रेनच्या कीव्हमध्ये पोहोचला. त्याने फ्रान्सच्या आर्मीसाठी देखील काम केलं आहे. त्याने पाच देशांतून प्रवास करत कीव्ह गाठलं. लियोनने आपल्यासोबत बँडेज, अँटीसेप्टिक, सेलिन फ्लूड, ट्रॉमा किट्स आणि इतर मेडिकल उपकरणं घेतली होती. ते 48 तास खूप कठीण होते पण लोकांची मदत करता आल्याने मला खूप चांगलं वाटत आहे असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया