शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Russia Ukraine War: युक्रेनच्या अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले रशियन सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 08:57 IST

Russia Ukraine War: युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशनदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रे ताब्यात घेतली. यादरम्यान, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले आहेत.

कीव: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बफेक करण्यात येत आहे. त्याचवेळी रशियन सैन्यानेही जमिनीवरुन युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. युक्रेनच्या चेर्नोबिल अणु प्रकल्पातून (Chernobyl Nuclear Plant) काही महत्त्वाची उपकरणे रशियन सैनिकांनी नेल्याची माहिती समोर आली आहे.

अनेकांचे आयुष्य धोक्यातया उपकरणांद्वारे रेडिओअॅक्टिव्ह कचऱ्यातील आण्विक सामग्रीवर लक्ष ठेवण्यात यायचे. मात्र आता त्याचे डेटा ट्रान्समिशन थांबले आहे. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून देखरेख यंत्रणा हटवल्यामुळे लोकांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. अणुऊर्जा प्रकल्पातील धोकादायक किरणोत्सर्गावर यापुढे लक्ष ठेवता येणार नाही. त्यामुळे आता लोकांचे आयुष्य धोक्यात आले आहे.

त्रिपक्षीय बैठक होऊ शकतेतत्पूर्वी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA), रशिया आणि युक्रेन यांच्यात त्रिपक्षीय बैठक घेण्याच्या कल्पनेला योग्य म्हटले. व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे किंवा तिसऱ्या कुठल्याही देशात ही बैठक आयोजित केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली भीतीयुक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रांवर ताबा मिळवला. तत्पूर्वी, युक्रेनने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला कळवले की देशातील सर्वात मोठ्या झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पातील सहापैकी दोन अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि रेडिओअॅक्टिव्ह पातळी सामान्य आहे. त्याच वेळी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की यांनी युझनौक्रेन्स्क अणुऊर्जा प्रकल्पाकडे रशियन सैन्य जात असल्याने हा प्रकल्प धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय