शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: ज्याची जगाला धास्ती, तेच झाले! चीन रशियाच्या मदतीला उतरला; पुतीन यांचा शस्त्रसाठा संपत आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:13 IST

Russia will exhaust its ability to fight in Ukraine: एकीकडे शस्त्रसाठा संपत असताना दुसरीकडे युक्रेनमध्ये सैन्य देखील पुढे जाऊ शकत नाहीय. यामुळे रशिया मोठ्या संकटात सापडला आहे. ज्या भागांवर रशियाने कब्जा केला आहे तिथे देखील युक्रेनने ताकद लावण्यास सुरुवात केली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून युक्रेनवर हल्ला प्रकरण पुतीन यांना चांगलेच भारी पडले आहे. युद्ध एवढा काळ लांबेल असे कोणालाही वाटले नव्हते. आज युद्धाला २० दिवस झाले असून युक्रेनचे सैन्य आणि नागरिक त्वेषाने लढा देत आहेत. यामुळे आणखी काही काळ हे युद्ध असेच सुरु राहणार आहे. यामुळे रशियाला दारुगोळ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. केवळ १० दिवसच पुरेल एवढा शस्त्रसाठा शिल्लक असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. 

अशावेळी जगातील दोन महासत्ता एकत्र आल्या आहेत. युक्रेनमध्ये हल्ले कमजोर होऊ लागल्याने रशियाने चीनकडे मदत मागितली होती. यावर चीनने रशियाला पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरविण्यास होकार दिला आहे. अमेरिकेने चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. तरी देखील चीनने रशियाला मदतीचा हात पुढे केला आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच रशियाने चीनसोबत एक करार केला होता. त्यामध्ये चीनने रशियाचा गहू खरेदी करण्यास तयारी दर्शविली होती. आता पुन्हा चीनने रशियाला मदत केल्याने ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. 

अमेरिका आणि ब्रिटनच्या संरक्षण तज्ज्ञांनी रशियाकडे युक्रेनमध्ये लढण्यासाठी फारतर १० ते १४ दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा आहे, असा दावा केला आहे. एकीकडे शस्त्रसाठा संपत असताना दुसरीकडे युक्रेनमध्ये सैन्य देखील पुढे जाऊ शकत नाहीय. यामुळे रशिया मोठ्या संकटात सापडला आहे. ज्या भागांवर रशियाने कब्जा केला आहे तिथे देखील युक्रेनने ताकद लावण्यास सुरुवात केली आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एका राजनैतिकाने सांगितले की, युक्रेन युद्धात चीनने रशियाला लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचा पर्याय खुला ठेवल्याची माहिती अमेरिकेकडे आहे. मदतीच्या बदल्यात चीनला रशियाकडून काय हवे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाchinaचीनVladimir Putinव्लादिमीर पुतिन