शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Russia Ukraine War: पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:53 IST

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण ६०० मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास ९५ टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे. 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यातच आता न्यूझीलंडने (New Zeland) एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह १०० महत्त्वाच्या व्यक्तींवर बंदी घातली आहे. या यादीत रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचाही समावेश आहे.

रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.  या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.

दक्षिण कोरिया व्यवहार थांबवणार-

रशियाविरुद्ध अतिरिक्त निर्बंधांचा एक भाग म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबतचे व्यवहार निलंबित करण्यात दक्षिण कोरिया युनायटेड स्टेट्स आणि इतरांमध्ये सामील होईल, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले. संबंधित सरकारी एजन्सींशी सल्लामसलत केल्यानंतर मंजुरीचे अधिक तपशील जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी, दक्षिण कोरियाने सात प्रमुख रशियन बँकांसह आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती.

नेटफ्लिक्सने रशियातील सेवा थांबवली-

Netflix Inc ने रशियातील आपली सेवा निलंबित केली आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला, नेटफ्लिक्सने रशियामधील भविष्यातील सर्व प्रकल्प तात्पुरते थांबवले होते. परंतु आता त्यांनी सेवा निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाNew Zealandन्यूझीलंड