शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी एक 'वार', मास्टरकार्ड-व्हिसाने बंद केली सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 14:07 IST

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.

मॉस्को: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यातच आता मास्टरकार्ड आणि व्हिसानेही मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्या रशियामधील त्यांच्या सेवा बंद करत आहेत. मास्टरकार्डने शनिवारी सांगितले की, त्यांचे नेटवर्क यापुढे रशियन बँकांकडून जारी केलेली कार्डे स्वीकारणार नाही. तसेच, इतर कोणत्याही देशात जारी केलेले कार्ड रशियन स्टोअर किंवा एटीएममध्ये काम करणार नाही.

मास्टरकार्डने निवेदनात काय म्हटले?मास्टरकार्डचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एल केली यांनी एका निवेदनात म्हटले की, ''आम्ही हा निर्णय घाईने घेतलेला नाही. ग्राहक, भागीदार आणि सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. रशियाच्या या कृत्यामुळे आम्हाला ही कृती करण्यास भाग पाडले गेले आहे."

व्हिसाने आपल्या निवेदनात काय म्हटले ?शनिवारी जारी केलेल्या निवेदनात व्हिसाने म्हटले की, ''युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे ते रशियातील त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने निलंबित करत आहेत. रशियामध्ये जारी केलेल्या व्हिसा कार्डांसह सुरू केलेले सर्व व्यवहार यापुढे देशाबाहेर चालणार नाहीत. रशियामधील ग्राहक त्यांच्या देशात कार्डद्वारे पेमेंट करू शकतील, परंतु कंपनी व्यवहार प्रक्रिया राबणार नाही. हा व्यवहार रशियाच्या नॅशनल पेमेंट कार्ड सिस्टम किंवा NSPK अंतर्गत असेल.''

युक्रेनियन लोकांसाठी फॅमिली व्हिसा योजना सुरूरशियावरील सततच्या निर्बंधांदरम्यान, यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांनी शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांसाठी सरकारने आधीच जाहीर केलेली फॅमिली व्हिसा योजना औपचारिकपणे सुरू केली. या योजनेंतर्गत, युक्रेनियन वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले युक्रेनियन नागरिक रशियासोबतच्या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या युक्रेनियन नातेवाईकांना कोणतेही व्हिसा शुल्क न भरता यूकेमध्ये आणू शकतील. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीयVisaव्हिसा