शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Russia Ukraine War : युद्धात माणुसकीचं दर्शन! बाईकवर 2400 किमीचा प्रवास करून युक्रेनमध्ये माजी सैनिकाने पोहचवली औषधं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:08 IST

Russia Ukraine War : युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. 

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. दोन्हीकडून एकमेकांविरोधात वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन सैन्याची मोठी हानी घडवून आणल्याचा दावा युक्रेनियन सैन्याने केला आहे. याच दरम्यान युद्ध पेटलेलं असताना माणुसकीचं दर्शन घडवणारी एक घटना आता समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या जुन्या बाईकने 48 तास 2414 किलोमीटरचा प्रवास करून मोलाचं काम केलं आहे. युक्रेनमधील लोकांना औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला आहे. 

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लियोन क्रिब असं या व्य़क्तीचं नाव असून त्याने ब्रिटनमधील वेस्ट ससेक्सच्या चेस्टरमधून आपल्या जुन्या बाईकने प्रवास सुरू केला. लियोनने फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी आणि पोलंडचा प्रवास केला. त्यानंतर औषधं घेऊन युक्रेनच्या कीव्हमध्ये पोहोचला. त्याने फ्रान्सच्या आर्मीसाठी देखील काम केलं आहे. त्याने पाच देशांतून प्रवास करत कीव्ह गाठलं. 

रशियाने हल्ला केल्यामुळे युक्रेनच्या रुग्णालय़ांचं मोठं नुकसान झालं आहे. लियोनने दिलेल्य़ा माहितीनुसार, त्याला Korczowa बॉर्डरवर वाट पाहावी लागली. त्यानंतर त्याने पोलंड बॉर्डर पार करून कीव्हच्या दिशेने प्रवास केला. लियोनने आपल्यासोबत बँडेज, अँटीसेप्टिक, सेलिन फ्लूड, ट्रॉमा किट्स आणि इतर मेडिकल उपकरणं घेतली होती. ते 48 तास खूप कठीण होते पण लोकांची मदत करता आल्याने मला खूप चांगलं वाटत आहे असं म्हटलं आहे. लियोनच्या कुटुंबाला त्याची काळजी वाटत होती. पण त्याने जाण्याचा निर्णय पक्का केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी मुलीसाठी धावला भारतीय तरुण; वाचवला जीव

एका भारतीय तरुणाने पाकिस्तानी मुलीचा जीव वाचवला आहे. तिला सुखरूपरित्या रोमानिया बॉर्डरवर पोहोचलं आहे. पाकिस्तानी दूतावासाने अंकितचं भरभरून कौतुक केलं आहे. "भारतीय असलेल्या अंकितने आमच्या मुलीला आमच्याकडे आणलं आणि आमची मुलगी वाचली आहे. बेटा! खूप खूप धन्यवाद. दोन्ही देशातील जनतेने एकमेकांचे पाय खेचण्याची नाही, तर प्रेम आणि पाठिंबा दाखवण्याची वेळ आली आहे. आपल्या द्वेषापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाmedicinesऔषधं