शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Joe Biden Russia Ukraine War - युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही, पण रशियाला मनमानीही करू देणार नाही : जो बायडेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 08:37 IST

Joe Biden Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅडरेसला (State Of the Union Address) संबोधित केलं. 

Joe Biden Russia Ukraine War : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध छेडलं आहे. या युद्धात युक्रेनला मोठं नकसान झालं असून युक्रेननं अन्य देशांकडे मदतही मागितली होती. दरम्यान, रशियानं युद्धाची सुरूवात करून मोठी चूक केली असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान बायडेन यांनी स्टेट ऑफ द युनियन अॅड्रेसला संबोधित केलं. यावेळी त्या ठिकाणी युक्रेनचे राजदूतदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी युक्रेनमध्ये सैन्य उतरवणार नसलो तरी रशियाला मनमानीही करू देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

"आम्ही युरोपियन संघासोबत मिळून काम करत आहोत. यामध्ये युरोपिय सहकाऱ्यांना साथ देत रशियात शासन करणाऱ्या लोकांच्या बोटी, त्यांची लक्झरी अपार्टमेंट, खासगी जेट जप्त केली जात आहेत. जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू केलेल्या युद्धामुळे रशियाला कमकुवत आणि जगातिल अन्य देशांना ताकदवान म्हटलं जाईल," असं बायडेन यावेळी म्हणाले.  जेव्हा हुकूमशहांना त्यांच्या आक्रमकतेची किंमत मोजावी लागत नाही तेव्हा ते अधिक अराजकता निर्माण करतात हे आपण इतिहासातून शिकलो आहोत. तेव्हा ते असं करत राहतात. त्याची किंमत आणि धोका जगाला मोजावी लागत असल्याचंही ते म्हणाले. "अमेरिका आणि सहकारी देश मिळून नाटो देशांच्या इंच अन् इंच जमिनीचं संरक्षण करतील. अमेरिकेनं रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. आम्ही रशियाच्या खोटेपणाचा सामना सत्यानं केला आहे. युक्रेनला सैन्य, आर्थिक मदत आणि मानवीय मदत केली जात आहे," अशी माहितीही बायडेन यांनी दिली.  पुतिन जगापासून अलिप्त"पुतिन यावेळी जगापासून इतके अलिप्त झाले आहेत, जितके ते यापूर्वी कधीही नव्हते. युरोपियन युनियनचे तब्बल २७ देश यावेळी युक्रेनसोबत आहेत," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका