शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: ब्रिटिश आर्मीचा स्नायपर युक्रेनमध्ये घात लावून बसलाय! पत्नीशी खोटं बोलून घरातून निघाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 09:35 IST

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका ब्रिटिश सैनिकाची कहाणी खूप चर्चेत आहे. हा सैनिक आपल्या पत्नीला खोटं बोलून थेट युक्रेनमधील लोकांच्या मदतीसाठी आला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 11वा दिवस आहे. युद्धादरम्यान युक्रेनमधून अनेक किस्से समोर आले आहेत, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. काही कथा शौर्याच्या आहेत, तर काही भावनिक आहेत. दरम्यान, एका माजी ब्रिटिश सैनिकाची कहाणी समोर आली आहे, जो आपल्या पत्नीशी खोटं बोलून रशियाशी युद्ध करण्यासाठी युक्रेनला गेला. त्याने पत्नीला बाहेर फिरायला जात असल्याचे सांगितले होते.

बायकोला खोटं बोलून युक्रेन गाठलेद सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, हा माजी सैनिक युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान लोकांना मदत करण्यासाठी आणि रशियाशी लढण्यासाठी गेला आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने पत्नीला आपण पक्षीनिरीक्षणासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले. पण तो आपल्या पत्नीशी खोटं बोलला आणि थेट युक्रेनला पोहचला.

ब्रिटनचा माजी सैनिक युक्रेनमध्येहा ब्रिटिश सैनिक ब्रिटनमधील विरलचा रहिवासी आहे. तो ब्रिटनवरुन पोलंडला आला आणि नंतर सीमा ओलांडून युक्रेनमध्ये प्रवेश केला. हा माजी सैनिक रशियाविरोधात युक्रेनच्या लष्कराला मदत करण्यासाठी गेला आहे. त्याला दोन मुलं आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर तो म्हणाला की, मी युक्रेनला लढाईत सहभागी होण्यासाठी आल्याचे कळल्यावर पत्नी घाबरली असेल. पण, लवकरच मी तिला फोन करुन सर्व काही समजावून सांगेन.

ब्रिटिश सैन्यात स्नायपर म्हणून काम केलेरिपोर्टनुसार, ब्रिटनमधून युक्रेनमध्ये गेलेल्या या व्यक्तीने ब्रिटीश आर्मीमध्ये स्नायपर म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. या कठीण काळात आपण युक्रेनच्या लोकांना मदत केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. युक्रेनच्या लोकांना अनुभवी सैनिकांची गरज आहे आणि त्यांना तो अनुभव आहे. त्याच्यासारखे आणखी अनेक लोक ब्रिटनमधून युक्रेनमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय