शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: रशियन फौजेचा तो 64 किमींचा ताफा जागच्या जागीच थांबला; काय घडलेय? कीवकडे जाईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 11:16 IST

रशियाने कालपासून कीववर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली असून मिसाईल हल्ल्यांवर रशियाचा भर आहे. काल काही तासांत काही डझनांवर मिसाईल हल्ले करण्यात आहे.

युक्रेनची राजधानी कीववर चाल करून जाणाऱ्या रशियन सैन्याच्या लांबलचक ताफ्यामुळे जग हादरले होते. परंतू गेले चार-पाच दिवस झाले हा ताफा जागच्या जागीच थांबलेला आहे. काय झालेय कोणालाच काही कळायला मार्ग नाहीय. NEXTA या वृत्तवाहिनीने यासंबधी वृत्त दिले आहे. 

रशियाने कीवमध्ये सैन्य घुसल्याचा दावा केला आहे. परंतू, रशियन मिलिट्रीच्या वाहनांचा झालेला विद्ध्वंस युक्रेनमध्ये दिसत आहे. रशियाने कीववर हल्ला करण्यासाठी व ताब्यात घेण्यासाठी ६४ किमी लांब रणगाडे, बुलेटप्रूफ गाड्या आणि ट्रक भरून सैन्य आणि शस्त्रांचा ताफा कीवकडे पाठविला होता. याचा फोटो व्हायरल झाला तेव्हापासून सर्वांनाच धडकी भरली होती. एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य कीववर आक्रमण करणार मग युक्रेन सैनिकांचा निभाव कसा लागणार असे वाटत होते. परंतू हा ताफा जागेवरच असल्याने नेमके काय घडलेय असा प्रश्न आता पडू लागला आहे. एकतर या वाहनांना बर्फवृष्टीमुळे निर्माण झालेल्या चिखलांचा सामना करावा लागला असेल किंवा त्यांचे इंधन संपले असेल असा अंदाज लावला जात आहे. 

याचबरोबर रशियन सैन्य जेव्हापासून युक्रेनमध्ये घुसलेय तेव्हापासून त्यांना अन्न पाणी, शस्त्रे आणि इंधनाची रसद मिळत नाहीय. पहिल्या दिवसापासून हे सैन्य बेजार झालेले आहे. त्यामुळे अनेक सैनिकांनी युद्धास नकार देत शस्त्रे, वाहने युक्रेन सैन्याकडे सोपविल्याचेही दावे केले जात आहेत. दुसरी बाब म्हणजे युक्रेनने पुन्हा रशियाच्या सीमेवरील शहरांवर ताबा मिळविल्याने रशियन फौजांची रसद बाधीत झाल्याचा अंदाज लावला जात आहे. 

रशियाने कालपासून कीववर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली असून मिसाईल हल्ल्यांवर रशियाचा भर आहे. काल काही तासांत काही डझनांवर मिसाईल हल्ले करण्यात आहे. यामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या नागरिकांना संबोधित करताना कदाचीत हे माझे अखेरचे बोलणे असेल असेही म्हटले होते. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने तातडीने हालचाली करत जेलेन्स्की यांना सुरक्षित करण्यासाठी कमांडो पाठविल्याचा दावा रशियाने केला आहे. जेलेन्स्की यांना युक्रेनमधून बाहेर नेले जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया