शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: 11 वर्षीय युक्रेनियन मुलाच्या हिमतीला सलाम, जीव वाचवण्यासाठी एकट्याने केला 1000 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 11:52 IST

Russia-Ukraine War: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. यामुळे आता युक्रेनमध्ये राहणारे लाखो लोक शेजारील देशांमध्य आश्रय घेत आहेत.

कीव: रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. युक्रेनमधील अनेक लोक भीतीमुळे इतर देशांमध्ये आश्रय मिळवण्याच्या उद्देशाने स्थलांतर करत आहेत. यामुळेच गेल्या काही दिवसांत दहा लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले आहेत. यातच एका 11 वर्षीय युक्रेनियन मुलाच्या हिमतीला सर्वजण सलाम करत आहेत. हा मुलगा जीव वाचवण्यासाठी एकट्याने तब्बल 1,000 किमी प्रवास करुन स्लोव्हाकियाला पोहोचला. त्याच्याकडे फक्त एक पिशवी, आईची चिठ्ठी आणि दूरध्वनी क्रमांक होता.

'सर्वात मोठा नायक'सविस्तर माहिती अशी की, 11 वर्षीय मुलगा दक्षिण-पूर्व युक्रेनमधील झापोरिझ्झ्याचा रहिवासी होता. गेल्या आठवड्यात या भागावर रशियाने ताबा मिळवला आहे. रशियाच्या ताब्यानंतर हा मुलगा जीव वाचवण्यासाठी एकटा निघाला, आजारी नातेवाईकाची काळजी घेण्यासाठी त्याच्या पालकांना युक्रेनमध्ये राहावे लागले. हा एक हजार किमीचा खडतर प्रवास पूर्ण केल्यानंतर मुलाने त्याच्या निर्भयपणा आणि दृढनिश्चयासाठी खूप प्रशंसा मिळवली. स्लोव्हाकियाच्या मंत्रालयाने फेसबुक पोस्टमध्ये मुलाला "काळरात्रीचा सर्वात मोठा नायक" म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधलामिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे नातेवाईक स्लोव्हाकियामध्ये राहतात. मुलाच्या आईने त्याचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांकडे  पाठवण्याचा निर्णय घेतला. पालकांना मुलासोबत जाता येत नव्हते, म्हणून आईने अकरा वर्षीय मुलाला स्लोव्हाकियाच्या रेल्वेत बसवले. या प्रवासात त्याच्यासोबत एक प्लास्टिकची पिशवी, पासपोर्ट आणि एका चिठ्ठीत संदेश आणि नातेवाईकाचा फोन नंबर होता. मुलगा जेव्हा स्लोव्हाकियामध्ये दाखल झाला, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील फोन नंबरच्या मदतीने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

अन् मुलाच्या राहण्याची सोय झालीमुलाच्या आईने त्याची काळजी घेतल्याबद्दल स्लोव्हाकिया सरकार आणि पोलिसांचे आभार मानले. स्लोव्हाकियाच्या गृह मंत्रालयाने फेसबुक पोस्ट करुन मुलाच्या "निर्भयपणा आणि दृढनिश्चयाचे" कौतुक केले. दरम्यान, सध्या मुलाला काही स्वयंसेवकांनी आपल्यासोबत नेले असून, त्याची खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता लवकरच मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पाठवले जाईल. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय