शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine: डोनबासवर नियंत्रणाचे रशियाचे प्रयत्न अयशस्वी; युक्रेनचा तिखट प्रतिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 02:53 IST

गेल्या चोवीस तासांत आठ हल्ले परतावून लावले, डोनेत्स्क व लुहान्स्क भागावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाने आपली ताकद पणाला लावली आहे.

कीव्ह : युक्रेनचा औद्योगिक प्रांत असलेल्या पूर्व डोनबासच्या भागावर संपूर्ण कब्जा करण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेन सैनिकांच्या तिखट प्रतिकारामुळे अद्याप यशस्वी झालेले नाहीत. हा भाग लवकर जिंकून घेता यावा यासाठी रशियाने काही लष्करी तुकड्या मारियुपोलमधून पूर्व युक्रेनमध्ये हलविल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत रशियाने केलेले आठ हल्ले युक्रेनने परतवून लावले. 

डोनेत्स्क व लुहान्स्क भागावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी रशियाने आपली ताकद पणाला लावली आहे. या भागातून क्रिमियापर्यंत जाणारे सारे मार्ग आपल्या कब्जात असावेत अशी त्या देशाची इच्छा आहे. शत्रूचे नऊ रणगाडे, १३ लष्करी वाहने, तीन तोफा नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. पोपास्ना येथे रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोनजण ठार झाले. डोनेत्स्क व लुहान्स्कमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन एक ट्रेन स्लोवाकिया व हंगेरी या देशांच्या सीमेजवळील युक्रेनच्या चोप या शहरात शनिवारी सुखरूप पोहोचली. मारियुपोलवर संपूर्ण कब्जा केल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा युक्रेनच्या प्रतिकारामुळे खोटा ठरला आहे.

या शहरात अडकलेल्या महिला, मुले, वयोवृद्ध यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे युक्रेनच्या सैनिकांनी केलेले प्रयत्न रशियाच्या अडवणुकीमुळे पुन्हा फोल ठरले आहेत. रशियाने मारियुपोलहून पूर्व युक्रेनच्या अन्य भागांत लष्कराच्या काही तुकड्या हलविल्या आहेत तसेच हल्ल्यांतही वाढ केली आहे. 

संरक्षण सामग्रीसाठी भारताने रशियावर विसंबून राहू नये -अमेरिका

वॉशिंग्टन : संरक्षण सामग्रीसाठी भारताने रशियावर विसंबून राहू नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पेन्टॅगॉनचे प्रसारमाध्यम सचिव जॉन किर्बे यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या या भूमिकेला युरोपीय देशांचीही सहमती आहे. युक्रेनच्या युद्धाचा भारताने अद्याप शब्दांत निषेध केलेला नाही, असा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला होता. अमेरिका, युरोपने घातलेल्या निर्बंधांचा फटका रशियातील संरक्षण उद्योगाला बसला आहे. त्याची झळ भारतालाही सोसावी लागेल, असा अमेरिकेचा दावा आहे. भारताची संरक्षण सामुग्रीची गरज पुरविण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वीही सांगितले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया