शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:14 IST

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाकडून भारताला मिळणाऱ्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Russia War)  सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. अशा स्थितीत रशियासोबतच्या भारताच्या संरक्षण करारांवर त्याचा परिणाम होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या अनेक आर्थिक निर्बंधांमुळे S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या(S-400 Air Defence System) वितरणावर परिणाम होऊ शकतो का? याचे उत्तर रशियन राजदूताने दिले.

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'भारताला S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या पुरवठ्याबाबत मला कोणताही अडथळा दिसत नाही. हा करार सुरू ठेवण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. रशिया नेहमीच राखेतून उठला आहे आणि तो पुन्हा उठेल. आम्ही पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी पावले उचलली आहेत',अशी माहिती त्यांनी दिली.     

रशिया-भारत S-400 एअर डिफेन्स सिस्टीम करारभारताला रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणालीची पहिली खेप मिळाली आहे, परंतु इतर चार वितरित करणे बाकी आहे. आतापर्यंत रशियाकडून डिलिव्हरी होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसत नाहीत, परंतु युक्रेनवरील हे संकट दीर्घकाळ चालले तर निश्चितच चिंतेची बाब ठरू शकते. याशिवाय, CAATSA कायद्यांतर्गत खरेदीसाठी अमेरिकेने भारतावर बंदी घातली तर, ही एक चिंतेची बाब असेल. आतापर्यंत अमेरिकेने चीन आणि तुर्कीवर निर्बंध लादले आहेत, मात्र भारताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

भारताला अधिक नुकसान होण्याची शक्यता रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक बाजारपेठेला धोका कायम आहे. जगभरातील शेअर बाजार वाईट काळातून जात आहेत. काही देशांच्या चलन मूल्यावर परिणाम झाला आहे. या भू-राजकीय तणावाचा वाईट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसू शकतो. प्रसिद्ध वित्तीय आणि संशोधन कंपनी नोमुरा यांच्या अहवालानुसार, युक्रेन संकटामुळे आशियातील सर्वात मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया