शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

Ukraine Russia War: '...तोपर्यंत आम्ही हल्ले थांबवणार नाहीत'; रशियन संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:29 IST

Ukraine Russia Conflict: दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या.

मॉस्को: मागील सहा दिवसांपासून युक्रेनवर रशियाचे लष्करी हल्ले सुरुच आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, पण सर्व बैठका निष्फळ ठरल्या. रशियाने गेल्या सहा दिवसांत युक्रेनच्या विविध शहरात अनेक हल्ले करुन मोठा भाग ताब्यात घेतला. यादरम्यान, अनेक ठिकाणी मोठा विनाश झाला, पण पुतिन अजून थांबायला तयार नाहीत. यातच आता रशियाच्या संरक्षण मंत्र्यांचे एक मोठे वक्तव्य समोर आले आहे.

'...तोपर्यंत हल्ले सुरू राहणार'रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सेर्गेई शोएगु( Russian Minister of Defence is Army General Sergey Shoygu )  यांनी रशियाचे हल्ले थांबणार नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही युक्रेनच्या सामान्य नागरिकांवर हल्ले करत नाही आहोत. आम्ही फक्त युक्रेनचे लष्करी ठिकाणे उद्धवस्त करत आहोत. जोपर्यंत युक्रेन हार मानत नाही, तोपर्यंत आम्ही हल्ले सुरुच ठेवणार, असेही ते म्हणाले. 

रशियाच्या हल्ल्यात भारतीय तरुणाचा मृत्यूदरम्यान, युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "आज सकाळी खार्किव येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आम्ही पीडित कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो." 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय