शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: "मी कुणालाही घाबरत नाही", युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जारी केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 09:14 IST

Ukraine Russia War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना, त्यांनी व्हिडिओ जारी करुन युक्रेनमध्येच असल्याचे सांगितले आहे.

कीव:युक्रेन आणि रशियामधील युद्धाचा (Russia-Ukraine War) आज 13वा दिवस आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (volodymyr zelensky) देश सोडून पळून गेल्याचे काही वृत्त समोर आले होते, पण आता वोलोडिमीर जेलेन्स्कींनी कीवमध्ये असल्याचा दावा करणारा व्हिडिओ जारी केला आहे. ''मी कोणाला घाबरत नाही'', असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

"मी घाबरत नाही..."आपल्या व्हिडिओत जेलेन्स्की म्हणतात- ''मी कुठेही पळून गेले नाही आणि लपलोही नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी लपवत नाही. युद्ध जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.'' जेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हिडिओ जारी करुन युक्रेनमध्येच असल्याचे सांगितले आहे.

युद्धबंदीनंतरही रशियाचे हल्ले सुरूच आहेतरशियाने नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळपासून युद्धविरामासह अनेक भागात मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याची घोषणा केली. पण, कॉरिडॉरच्या घोषणेनंतरही, रशियन सैन्याने काही युक्रेनियन शहरांवर रॉकेट हल्ले आणि काही भागात भीषण लढाई सुरुच ठेवली. उत्तर, दक्षिण आणि मध्य युक्रेनमधील शहरांमध्ये रशियाने गोळीबार सुरू ठेवल्याने हजारो युक्रेनियन सुरक्षितपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

निर्वासितांची संख्या 17 लाखांच्या पुढेयुद्धातील मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. खार्किव प्रदेश पोलिसांनी सोमवारी सांगितले की, तिथे 209 लोकांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 133 सामान्य नागरिक होते. यूएन निर्वासित एजन्सी म्हणते की, युद्धग्रस्त युक्रेन सोडून आतापर्यंत 17 लाखांहून अधिक लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. इतर अनेक शहरांमध्ये गोळीबारात अडकले आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय