शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Russia Ukraine Crisis: यूक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा ‘सीक्रेट प्लॅन’ लीक; ३ टप्प्यात हल्ला, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 22:20 IST

जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे

मॉस्को – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यूक्रेनबाबत कुठल्याही दबावाला झुकण्यास तयार नाहीत. दुसरीकडे यूक्रेनमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो संघानं तैनात केलेल्या सैन्याची संख्या वाढवली आहे. रशियाच्या चहुबाजूने नाटो समर्थित देशांचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. त्यानंतर रशियानं आमच्या ताकदीला आव्हान न देण्याचा इशारा दिला आहे.

त्याच दरम्यान, जर्मन मीडिया रिपोर्टनुसार, यूक्रेनवर रशियन हल्ल्याच्या योजनेचा खळबळजनक दावा केला आहे. यूक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा प्लॅन पूर्ण तयार आहे. यूक्रेनला रशिया समर्थित देश बनवण्यापासून रशियन धोरणाचं सरकार आखण्याबाबतचा उल्लेख आहे. एका परदेशी सीक्रेट सर्व्हिसच्या हवाल्याने हा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ३ टप्प्यातील योजनेचा आराखडा सांगण्यात आला आहे. या हल्ल्याचं नेतृत्व मॉस्कोच्या हातात आहे. बिल्डच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्याचा महत्त्वाचा टप्पा तिसरा आहे. त्यात यूक्रेनमध्ये रशियन समर्पित सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांची धरपकड करुन त्यांना नजरकैदेत ठेवलं जाणार आहे.

टप्पा १ आणि २ मध्ये यूक्रेनवर रशिया कब्जा करणार

या प्लॅननुसार, स्टेज १ मध्ये यूक्रेनवर रशियाचा हल्ला आणि स्टेज २ मध्ये मॉस्कोच्या नियंत्रणानंतर यूक्रेनमध्ये नवीन संसदेची स्थापना करुन विरोधकांना दाबण्याचा डाव आहे. बिल्डचा हा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने देण्यात आला आहे. सध्या यूक्रेनवर रशियाचा पूर्ण ताकदीनं हल्ल्याचं सर्वात मोठा धोका आहे. इतकचं नाही तर पुतीन त्यांचा प्लॅन कधीही बदलत नाहीत. त्यामुळे यूक्रेनवरील रशियाचा हल्ला फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यूक्रेनच्या प्रमुख शहरांना घेराव

 बिल्डच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, स्टेज १ मध्ये यूक्रेनला रशियन सैन्याकडून घेरलं जाईल. या काळात यूक्रेन सैन्याचा सामना केल्यावर प्रमुख शहरांना घेराव घातला जाईल. रशियन गुप्तचर सेवा आणि पुतीन यांचे प्रामाणिक नेते याआधीच यूक्रेनमध्ये सक्रीय होतील. ते रशियन समर्थक शहरांवर सत्ता स्थापन करतील. त्यानंतर बंडखोरांना आत्मसमर्पण करण्यासाठी दबाव वाढवला जाईल.

यूक्रेनची संसद भंग करुन रशियन सरकारची स्थापना

एकदा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यात यूक्रेन रशियन समर्थक सरकार स्थापन करेल. पीपुल्स राडा नावाची संसद यूक्रेनच्या संसदेला निरर्थक घोषित करेल. त्यानंतर रशियन समर्थक नेत्यांना सत्ता दिली जाईल. रशियन गुप्तचर यंत्रणेद्वारे या नेत्यांची निवड आधीच केली आहे. परंतु पीपुल्स राडा ही तात्पुरतं सरकार राहील. अखेरीस एक नव्या सरकारची स्थापना केली जाईल.

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिका