शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Crisis : मृत्युच्या तांडवातही शिक्षणात खंड नाही; वैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अन्‌ परीक्षा  सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 07:04 IST

Russia Ukraine Crisis : रशियाने केलेल्या आक्रमणामुळे मृत्यूचे तांडव सुरू असतानाही युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ऑनलाइन रुग्णसेवेचे धडे गिरवित आहेत.

शिवराज बिचेवार 

Russia Ukraine Crisis :  रशियाने केलेल्या आक्रमणामुळे मृत्यूचे तांडव सुरू असतानाही युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ऑनलाइन रुग्णसेवेचे धडे गिरवित आहेत. विशेष म्हणजे तासिका बुडविल्यास त्यांना आर्थिक दंडही आकारण्यात येतो. त्यामुळेच देशातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा युक्रेनकडे अधिक ओढा असतो. 

स्वप्नील सुनील पाटील हा युक्रेनच्या चर्निविस्ट येथील बुकोनियन मेडिकल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी युद्ध सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी देशात आला. सध्या तो नांदेडातील आपल्या घरी राहून ऑनलाइन शिक्षण घेत आहे. दिवसभर त्याच्या तासिका सुरू असतात. भारतीय दूतावासाने ज्यांना देशात परत जायचे आहे त्यांनी जावे अशा नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतर स्वप्नीलसह अनेक विद्यार्थी कीव्ह येथून विमानात बसले. स्वप्नील हा नांदेडात पोहोचला आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली.  स्वप्नील म्हणाला, युक्रेनमध्ये सहा वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी राहणे आणि खाणे-पिणे यासह जवळपास ३० ते ३२ लाखांचा खर्च येतो. त्याचबरोबर शिक्षणही उच्च दर्जाचे आहे. 

तेथे दर दिवशी होते परीक्षा  विद्यापीठात दररोज घेण्यात आलेल्या तासिकांवर दुसऱ्या दिवशी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत ५ पैकी ३ गुण मिळविणे बंधनकारक आहे. ३ गुण मिळत नाहीत तोपर्यंत तो पेपर वारंवार द्यावा लागतो. वर्षभरात झालेल्या सर्व तासिकांना हजर राहणे गरजेचे आहे. तासिकेला दांडी मारल्यास विद्यार्थ्यांना एका तासिकेसाठी ५० रॅव्हियल म्हणजे भारतीय चलनात १०० रुपये दंड पडतो. तसेच त्या प्राध्यापकाला विनंती करून अभ्यासक्रम समजून घ्यावा लागतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाcollegeमहाविद्यालय