शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:00 IST

आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे.

युक्रेनच्या सुरक्षा परिषदेने रशियन आक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी युक्रेनच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने, युक्रेन डोनेस्त्क आणि लुहान्स्क हे प्रदेश वगळता संपूर्ण युक्रेनमध्ये आणीबाणी लागू करेल, असे म्हटले होते.  तसेच, आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे.

तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पूर्व युक्रेनमधील (Ukraine) रशियन समर्थक फुटिरतावादी ‘डोनेत्स्क आणि लुहान्स्क पीपुल्स रिपब्लिक’’ यांना एक “स्वतंत्र” देश म्हणून मान्यता दिली आहे. पुतीन यांनी सोमवारी रात्री टेलीव्हिजनवर राष्ट्राला संबोधित केले होते. यावेळी बोलताना त्यांनी, किवच्या पश्चिमेसोबत वाढत असलेल्या सुरक्षा संबंधांवर टीका केली. तसेच, यूएसएसआरचा इतिहास आणि युक्रेनच्या समाजवादी सोव्हिएत प्रजासत्ताकाच्या निर्मितीसंदर्भात भाष्य करताना युक्रेनच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारावर शंका व्यक्त केली. ते देशाच्या पूर्वेकडील भागास "प्राचीन रशियन भूमी" म्हणत म्हणाले, "युक्रेनला स्वतःच्या राज्याची परंपरा कधीच नव्हती."

पुतीन यांनी दिली संरक्षणाची हमी -पुतीन यांच्या आदेशाने पूर्व यूक्रेनमधील डोनबास भागातील डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्कला पीपल्स रिपब्लिक (DPR, LPR) या दोन प्रदेशांबाबत मॉस्कोच्या अधिकृत मान्यतेसंदर्भात अवगत केले. त्यांना फरमानांमध्ये स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली आणि रशियन सैन्यासह त्यांच्या सुरक्षेची हमी दिली. याच बरोबर, रशियाचे तथाकथित शांतता सेन्य या प्रदेशांमध्ये तैनात केली जाईल, असे फरमानात म्हणण्यात आले आहे. पुतीन यांच्या या निर्णयानंतर, रशिया-युक्रेन संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया