शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'हल्ला केल्यास युक्रेनला पाठिंबा', अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 14:31 IST

Russia Ukraine Conflict : रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हटले आहे. 

वॉशिंग्टन :  रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती सैन्य तैनात केले आहे. दरम्यान, युक्रेनला पाठिंबा देणारे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश रशियाशी चर्चेतून तोडगा काढण्याची चर्चा करत आहेत. दरम्यान, अमेरिकेने रशियाला इशारा दिला आहे. रशियाकडून हल्ला केला तर आम्ही युक्रेनला पाठिंबा देऊ, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) म्हटले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकापाठोपाठ एक असे ट्विट करत रशियाला इशारा दिला आहे.  "आम्हाला संघर्ष नको आहे, परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची कारणे देखील समर्थनीय असू शकत नाहीत. यानंतरही जर रशियाने आपल्या योजनांवर ठाम राहिल्यास, ते विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी जबाबदार असेल", असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. 

'युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न'रशिया युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबतच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. हा युद्धबंदी नियमांचे उल्लंघन आहे. रशिया याआधीही असे खेळ खेळत आला आहे. युनायटेड स्टेट्स आणि आमचे मित्र राष्ट्र युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देत राहतील. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरु. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादू शकतील, अशी तयारी केली आहे, असे ट्विट करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एकप्रकारे रशियाला इशारा दिला आहे.

चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्नजो बायडेन म्हणाले, रशिया-युक्रेन वादावर चर्चेतून वाद मिटवता येईल. आताही उशीर झालेला नाही. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो. बायडेन म्हणाले की, दक्षिणेतील रशियन सैन्य अजूनही काळ्या समुद्राजवळ बेलारूसमध्ये तैनात आहे. त्यांनी युक्रेनला वेढा घातला आहे. रशियाचे सैन्य येत्या काही दिवसांत युक्रेनवर हल्ला करण्याचा विचार करत आहे.

'युक्रेनला पॅकेज देण्यात येईल'दरम्यान, व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र युक्रेनला पॅकेज देण्यावर विचार करत आहेत. सायबर स्पेसमध्ये रशिया अत्यंत आक्रमक पावले उचलत आहे. यासाठी वॉशिंग्टन रशियाला उत्तर देण्याची तयारी निश्चित करत आहे.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनrussiaरशियाAmericaअमेरिका