शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने रात्रभर युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे, ६ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:54 IST

निवासी इमारत, बालवाडीचे नुकसान

कीव्ह : रशियन सैन्याने रात्रभर युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केला. यात युक्रेनचे दुसरे सर्वांत मोठे शहर खार्किव येथे सहा लोक ठार तर ११ हून अधिक जखमी झाले, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. रशियाकडून शहरावरील करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत परिसराती निवासी इमारती, एक गॅस स्टेशन, एक बालवाडी, एक कॅफे, एक दुकान व कारचे नुकसान झाले, असे खार्किव प्रदेशाचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले.

रशियाने रात्रभर युक्रेनवर इराणी बनावटीचे ३२ शाहेद ड्रोन आणि सहा क्षेपणास्त्रांचा मारा केला, असे हवाई दलाच्या कमांडरने सांगितले. युक्रेनच्या हवाई दलाने तीन क्रूझ क्षेपणास्त्रे व २८ ड्रोन पाडले, असे लेफ्टनंट जनरल मायकोला ओलेशचुक यांनी सांगितले. “रशियन मारेकरी युक्रेनियन लोकांवर दहशत माजवत आहेत. खार्किव आणि इतर शांत शहरांवर हल्ले करीत आहेत,” असे ते म्हणाले. या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक सुरक्षित स्थळी आसरा घेताना दिसत आहेत. 

सैन्यांमध्ये घनघोर लढाईरशियन सैन्याने हल्ल्यांवर भाष्य केलेले नाही; परंतु, युक्रेनने शनिवारी सकाळी रशियावर व्हॅम्पायर रॉकेटचा मारा केल्याचे सांगितले. हे सर्वच्या सर्व १० रॉकेट हवाई संरक्षण यंत्रणेने रशियाच्या सीमावर्ती प्रदेश बेल्गोरोडवर पाडले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात अनेक ठिकाणी घनघोर लढाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया