शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र वर्षाव, सहा जण ठार; मोठ्या प्रमाणात विध्वंस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 07:12 IST

गेल्या तीन आठवड्यांतील हा सर्वांत मोठा हल्ला.

किव्ह : रशियाने गुरुवारी पहाटे संपूर्ण युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रांचा भडीमार केला. यातील काही क्षेपणास्त्रे निवासी इमारतींवर आदळल्याने सहा ठार, तर अनेकजण जखमी झाले. गेल्या तीन आठवड्यांतील हा सर्वांत मोठा हल्ला होता, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दक्षिण युक्रेनमधील झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला. हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात आहे. रशियाच्या ताब्यात गेल्यापासून हा प्रकल्प अंधारात बुडण्याची ही सहावी वेळ आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने या प्रकल्पाला १८ डिझेल जनरेटरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. हे जनरेटर दहा दिवस प्रकल्प चालवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. शीतकरण यंत्रणा सुरू न राहिल्यास प्रकल्प वितळण्याचा धोका उद्भवू शकतो. शीतकरण यंत्रणेसाठी सतत ऊर्जेची आवश्यकता असते, असेही सूत्रांनी सांगितले. 

राजधानीवर क्षेपणास्त्रांसह स्फोटक ड्रोनद्वारेही हल्ला करण्यात आला. यातील अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली. पण या हल्ल्याचा ऊर्जेच्या पायाभूत सुविधांना फटका बसला, असे किव्हच्या शहर प्रशासनाने सांगितले. 

लविव्ह प्रांतात तीन इमारती नष्टएक क्षेपणास्त्र लविव्ह प्रांतातील निवासी भागावर आदळल्याने पाचजण ठार झाले, असे लविव्हचे राज्यपाल मॅक्सिम कोझित्स्की यांनी सांगितले. तीन इमारती आगीमुळे नष्ट झाल्या असून, बचाव कर्मचारी ढिगारे उपसून मृतदेहांचा शोध घेत आहेत, असेही ते म्हणाले. 

गुटेरेस यांच्या दौऱ्यानंतर काही तासांनी हल्लेयुक्रेनला धान्य पाठविण्याची परवानगी देणारा व रशियाला अन्न, खते निर्यात करण्यास परवानगी देणारा करार वाढविण्याबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी किव्हला भेट दिल्याच्या काही तासांनंतर हे हल्ले झाले आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया