शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 06:41 IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य अन् रशियाचे हल्ले... नेमकं कनेक्शन काय?

कीव्ह (युक्रेन) : रशियाने शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीव्हसह इतर शहरांवर केलेल्या भयंकर हल्ल्यांत ४ ठार, तर २० जखमी झाले. या हल्ल्यात रशियाने ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० हून अधिक ड्रोनचा वापर केल्याचे युक्रेनच्या सूत्रांनी म्हटले आहे.

अनेक शहरांत कित्येक तास स्फोटांचे आवाज येत होते. या हल्ल्यांमुळे कित्येक इमारतींमधून आगीचे लोळ उठलेले दिसत होते. दरम्यान या हल्ल्यानंतर इमारतींसह ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहिमेसह बचावकार्य सुरू असल्याचे कीव्हचे महापौर विताली क्लित्स्को यांनी म्हटले आहे. 

हवाई सुरक्षा प्रणालीने रशियाच्या अनेक क्षेपणास्त्रे व ड्रोनना लक्ष्य केले. याचे जळते अवशेष नागरी वस्त्यांवर पडल्याने अनेक भागांत आग लागली. या हल्ल्यांत युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त असून  कित्येक ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य अन् रशियाचे हल्ले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धावर तोडगा काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बुधवारी एक वक्तव्य केले होते. या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यापूर्वी काही काळ मनसोक्त लढू देणेच योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही तासांतच रशियाने हे हल्ले केले आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया