शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लुहान्स्कचा ९७ टक्के भूभाग काबीज : रशियाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 05:31 IST

Russia : रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून डाेनबास भागाकडे माेर्चा वळविला आहे. सीव्हेराेडाेनेत्स्क शहराचा ताबा रशियन सैन्याने घेतला आहे. लुहान्स्क भागाचे हे शहर प्रमुख केंद्र आहे.

कीव्ह : युक्रेनच्या पूर्वेकडील भागात  माेठी आघाडी घेतल्याचा दावा रशियाने केला असून, या भागात आणखी सैनिकांना पाठविण्यात आले आहे. लुहान्स्क क्षेत्राचा ९७ टक्के भाग काबीज केल्याचे रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शाेईगू यांनी म्हटले आहे.रशियाने गेल्या काही आठवड्यांपासून डाेनबास भागाकडे माेर्चा वळविला आहे. सीव्हेराेडाेनेत्स्क शहराचा ताबा रशियन सैन्याने घेतला आहे. लुहान्स्क भागाचे हे शहर प्रमुख केंद्र आहे. आता जवळपासची शहरे व एका औद्याेगिक क्षेत्राचा ताबा घेण्याचा रशियाचा प्रयत्न सुरू आहे.

तीन महिन्यांनी उघडले नाट्यगृहरशियाने पूर्व युक्रेनकडे माेर्चा वळविल्यानंतर राजधानी कीव्हमध्ये तीन महिन्यांनी नाट्यगृह उघडण्यात आले. त्याचा शाे हाउसफुल हाेता. नागरिकांचा कसा प्रतिसाद असेल, याबाबत शंका हाेती. मात्र, युक्रेनी जनतेने सर्व शाेला भरभरून प्रतिसाद दिला. (वृत्तसंस्था)

युक्रेनी सैनिकांचे मृतदेह दिले परतमारियुपाेलमधील एझाेवत्साल पाेलाद कारखान्यात मृत्युमुखी पडलेल्या युक्रेनच्या सैनिकांचे मृतदेह युक्रेनच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत आहे. या कारखान्याचा रशियाने ताबा घेतला आहे. त्यासाठी झालेल्या संघर्षात किती युक्रेनी सैनिक मारले गेले, याचा आकडा स्पष्ट झालेला नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया