शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा धोका, रशिया पूर्व चीन समुद्रात सैन्यशक्ती वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 13:26 IST

रशिया पॅसिफिक महासागर, पूर्व चीन समुद्र, फिलिपिन्स खाडी या भागात इतरांच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. 

अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावात आता रशियानंही उडी घेतली आहे.  रशियानेही सैन्याची तैनात वाढवण्याची घोषणा केली आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी गुरुवारी सांगितले की, रशिया सुदूर पूर्वेकडच्या भागात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य उपस्थिती वाढवित आहे. पूर्व चीन समुद्रातील रशियाचं नौदल व्लादिवोस्तोक येथे सैन्य उपस्थिती आणखी वाढवेल, असा विश्वास आहे. या भागाच्या माध्यमातून रशिया पॅसिफिक महासागर, पूर्व चीन समुद्र, फिलिपिन्स खाडी या भागात इतरांच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी धोका असलेल्या देशांची नावे घेतली नाहीतरशियन संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सर्गेई शोईगु म्हणाले की, पूर्व भागात वाढत्या तणावामुळे सैन्य वाढविण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आपल्या निवेदनात कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. हे नवीन धोके कोणते आणि सैनिक कुठे तैनात केले जातील हेदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, चीनला लागणारी सीमारेषा आणि प्रशांत महासागर प्रदेशातील वाढत्या तणावामुळे रशिया चिंताग्रस्त आहे. म्हणूनच तो आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सैनिकांची उपस्थिती वाढवत आहे.रशियादेखील विवादित प्रदेशात एक पक्ष होणारमॉस्कोमधील कार्नेगी सेंटरचे विश्लेषक अलेक्झांडर गबिवे म्हणाले की, ज्या प्रदेशात संघर्ष सुरू आहे, त्या प्रदेशात आपल्याकडे पुरेशी लष्करी क्षमता आहे, याची खातरजमा रशियाला करायची आहे. येत्या काही दिवसांत अमेरिका आणि चीन यांच्यात नौदल संघर्ष वाढण्याची  शक्यता आहे. रशिया कधीही निराधार नसेल आणि संपूर्ण प्रकरण हातावर हात ठेवून पाहू शकत नाही. त्याला या भागात आपली हवाई दल, लष्कर आणि नौदलाची संख्याही वाढवावी लागेल.रशिया एका दगडाने दोन पक्ष्यांना लक्ष्य करणारपूर्वेकडील भागात सैन्याची तैनाती वाढवून रशिया एका दगडाने दोन पक्षी मारत आहे. एकीकडे तो आपल्या पारंपरिक शत्रू अमेरिकेला थेट संदेश देत आहे, तर दुसरीकडे व्लादिवोस्तोक शहरावरील चीनच्या दाव्यांबाबतही कडकपणा दाखवत आहे. जपानच्या मदतीने अमेरिका या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती सातत्याने बळकट करीत आहे. त्यांची युद्धनौका दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्राभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत चीन आणि रशिया दोघेही सावध आहेत.पुतिनविरोधी चळवळीला चिरडण्याचा हेतूरशियाच्या पूर्वेकडील भागात दीर्घकाळ अध्यक्ष व्लादिमीर पुतिनविरोधात निषेध सुरू आहे. चिनी सीमेजवळील खबरोव्स्क शहर हे या निषेधाचं केंद्रस्थान आहे. शहरातून स्थानिक राजकीय नेत्याच्या अटकेविरोधात अनेक आठवडे विरोध प्रदर्शन सुरू आहे. अशा परिस्थितीत सैन्याच्या बळावर रशिया विरोधकांनाही चिरडू शकतो. 

टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाchinaचीन