शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुदानमध्ये उपासमारीशी झुंजत असलेल्या लोकांवर RSFचा भीषण हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:47 IST

Attack in Sudan: गेल्या अनेक वर्षांपासून अशांत असलेल्या सुदानमधील दार्फुर भागात शुक्रवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अशांत असलेल्या सुदानमधील दार्फुर भागात शुक्रवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये २० मुलांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) या पॅरामिलिट्री समुहाने केल्याचे सांगण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरएसएफने एल-फाशर शहर आणि जवळच्या जमजम आणि अबू शौक येथील निर्वासितांच्या तळांवर हल्ले केले.  

संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या ओसीएचएने शनिवारी सांगितले की, या हल्ल्यांमुळे आधीच उपासमारीचा सामना करत असलेल्या या तळांमध्ये परिस्थिती आणखीच बिघडली आहे.  आंदोलक समुहांपैकी एक असलेल्या जनरल कोऑर्डिनेशनल ऑफ डिस्प्लेस्ड पर्सन्स अँड रिफ्युजीजने सांगितले की, हे हल्ले गुरुवारी सुरू झाले, तसेच शनिवारपर्यंत सुरू होते. या हल्ल्यांमध्ये निवासी भाग, बाजार आणि आरोग्य केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. त्यात शेकडो लोक मारले गेले. तसेच अनेक जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. संघटनेने हे हल्ले युद्ध गुन्हेगारी आणि मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचा आरोप केला आहे.

मात्र आरएसएफने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जमजम कॅम्पवर सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, असे सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा सैन्याकडून पसरवण्यात येत असलेला प्रोपेगेंडा आहे, त्यामध्ये बनावट दृश्यांचा समावेश असून, त्यामाध्यमातून आरएसएफला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही आरएसएफने केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांसंबंधीच्या कायद्यांबाबत आपल्या असलेल्या कटीबद्धतेचा आरएसएफने पुनरुच्चार केला आहे. तसेच लष्कराकडून खऱ्या गुन्ह्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय