शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

राँग नंबर - 28 वर्षीय तरुणाने केले 82 वर्षाय महिलेशी लग्न

By admin | Updated: February 27, 2017 18:42 IST

तुम्हाला अथवा तुमच्या जवळ्याच्या व्यक्तीला अनेकदा राँग नंबरवरुन फोन येत असतील. पण राँगनंबर वरुन फोन आल्यानंतर कोणी एकमेंकाच्या प्रेमात पडले असे क्वचितच घडते

ऑनलाइन लोकमत

इंडोनेशिया, दि. 27 - तुम्हाला अथवा तुमच्या जवळ्याच्या व्यक्तीला अनेकदा राँग नंबरवरुन फोन येत असतील. पण राँगनंबर वरुन फोन आल्यानंतर कोणी एकमेंकाच्या प्रेमात पडले असे क्वचितच घडते. अशीच घटना इंडोनेशिया मधिल एका 28 वर्षीय तरुणा सोबत घडली आहे. त्याला एका राँग नंबरवरुन फोन आला ते दोघेही प्रेमात पडले पण ज्यावेळी वस्तूस्थिती समजली त्यावेळी त्याच्या पायाखालील जमीन सरकली. तो ज्या महिलेशी बोलतं होता ती 82 वर्षीय विधवा होती. ही वस्तूस्थिती पाहिल्यानंतरही तो डगमगला नाही. 

इंडोनिशिया मध्ये राहणारा 28 वर्षीय सोफयां लोहो डानडेल याला एक दिवशी अचानक राँग नंबर वरुन फोन आला. समोरुन मधूर आवाजात महिला बोलतं होती. तिच्या मधुर आवाजाने त्याला मोहित केले. पहिल्या कॉलनंतर त्यांचे सतत बोलणं सुरु झाले आणि दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलला.  तो फोनवरून ज्या महिलेशी बोलत होता तिचे नाव मार्था पोटू होते. अनेक दिवस सतत बोललल्यानंतर दोघांमधील प्रेम एवढे वाढले की, एक दिवस मार्थाला भेटण्यासाठी सोफयां तिच्या घरी गेला.  
 
दारावरील बेल वाजवली समोर 82 वर्षीय महिलेने दार उघडले. त्याने तीचे नाव विचारले त्या महिलेने आपले नाव मार्था असल्याचे सांगताच त्याच्या पायाखालची जमीन घसरली. पण मार्थाची हकीकत कळल्यानंतर सोफयां लोहोला दु:ख झाले. तिच्या बद्दलचा आदर अधिक वाढला. आणि त्याचे प्रेम अधिक भक्कम झाल्याचे त्याने सांगितले. 
 
मार्थाच्या पतीचे निधन दहा वर्षापूर्वी झाले. तीला दोन मुले आहेत. ते दोघेही नोकरीनिम्मत बाहेर असतात त्यामुळे घरात ती एकटीच राहते. मार्थापुर्वी मी कोणालाही डेट केले नाही असेही त्याने सांगितले. सोफयांने मार्थाला लग्नाची मागणी घातली, प्रथम मार्थाच्या कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केला होता. मात्र नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला आणि दोघे विवाहबद्ध झाले.