लष्करगाह (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानात विवाह सोहळ्यावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात २८ जण ठार झाले. मृतांत बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. हेल्मंड प्रांतातील संगीन जिल्ह्यात ही घटना घडली. पाहुणे वधूच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असतानाच रॉकेट आदळले. पोलिसांनी या हल्ल्याची चौकशी सुरू केली आहे. सुरक्षा दले व दहशतवाद्यांतील संघर्षादरम्यान या रॉकेटचा मारा करण्यात आल्याचा त्यांचा कयास आहे. नजीकच्या लष्करी चौकीवरून रॉकेटचा मारा झाला असावा, असे हेल्मंड प्रांताचे पोलीस उपप्रमुख बाचा गुल्ल यांनी सांगितले. जखमींना लष्करगाह येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानात विवाह सोहळ्यावर रॉकेट हल्ला, २८ ठार
By admin | Updated: January 2, 2015 02:21 IST