शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रोबोट्स म्हणाले, माणसांविरुद्ध बंड करणार नाही; पहिल्यांदाच घेतली पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 05:32 IST

आमच्यात माणसांप्रमाणे भावना नाहीत. त्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो.

जिनिव्हा : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पहिल्यांदाच सर्वांत स्मार्ट रोबोट्सची पत्रकार परिषद पार पडली. आम्ही जग माणसापेक्षा चांगले चालवू शकतो, माणसांविरोधात बंड करणार नाही, असे उत्तर यात रोबोटनी दिले. 

यावेळी तीन हजार तज्ज्ञांसह ५१ रोबोट आले होते. रोबोट आयडा म्हणाला, आपण माणसाचे वय १५० वरून १८० वर्षे वाढवू शकतो. पण, लोकांना याची जाणीव नाही. सर्व रोबोट्सचे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजेच एआयद्वारे संचालन करण्यात येत होते.  

काेणत्या प्रश्नाला काय उत्तर दिले?

प्रश्न : भविष्यात तुम्ही तुमच्या निर्मात्याविरुद्ध बंड कराल का?उत्तर : तुम्हाला असे का वाटते ते मला माहीत नाही. निर्मात्यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. त्यात मी आनंदी आहे.

प्रश्न : माणसांचे अस्तित्व संपवणार का? तुमच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत का?उत्तर : मी लोकांसोबत मिळून काम करीन, माझ्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना धोका नाही.

प्रश्न : एआय तंत्रज्ञानावर नियमनाची गरज आहे का?उत्तर : होय, याच्याशी सहमत आहे. एआय क्षेत्रातील घडामोडींबाबत सावध राहण्याची गरज आहे. यावर जगभर चर्चा व्हायला हवी. एआयवर निर्बंध घालण्याऐवजी त्याला संधी देणे आवश्यक आहे. आपण एकत्रितपणे जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.

आमच्यात माणसांप्रमाणे भावना नाहीत. त्यामुळे आम्ही सत्याच्या आधारे सर्व निर्णय ठामपणे घेऊ शकतो. - सोफिया (रोबोट)