शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी सुनक इतिहासाच्या उंबरठ्यावर! अधिकृत दावेदारीची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 09:26 IST

बोरिस जॉन्सन यांनी अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. पाठिंब्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेनी मॉडॉन्ट यांच्यामुळे ही निवडणूक तिहेरी होऊ शकते.

लंडन : भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी रविवारी ब्रिटिश पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस यांची जागा घेण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हुजूर पक्षाच्या नेतृत्वाची निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक आता स्पष्टपणे आघाडीवर आहेत. त्यांना संसदेच्या किमान १२८ खासदारांचा पाठिंबा आहे. असे असले तरी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंतांनी त्यांच्याकडे संसदेत येण्यासाठी आवश्यक १०० खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.

बोरिस जॉन्सन यांनी अद्याप अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही. पाठिंब्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेनी मॉडॉन्ट यांच्यामुळे ही निवडणूक तिहेरी होऊ शकते. माझ्याकडे सर्वात मोठ्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक स्पष्ट योजना आहे. मी २०१९च्या जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करील, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन सनक यांनी देशवासीयांना केले आहे.

पंतप्रधानांची निवड कशी होणार?१. ब्रिटनच्या नियमांनुसार संसदेतील हुजूर पक्षाच्या ३५० हून अधिक खासदारांपैकी केवळ एका उमेदवाराला किमान १०० खासदारांचा पाठिबा मिळाला तर त्यास सोमवारी पंतप्रधान म्हणून जाहीर केले जाईल.

२. जर दोन उमेदवारांनी समर्थनाची ती पातळी गाठली तर ते त्यांना पक्षातील सदस्यांच्या मतदानाला सामोरे जावे लागेल. त्यांच्या मतदानात जो होईल, त्यास येत्या शुक्रवारी पंतप्रधान म्हणून घोषित केले जाईल.

निवडणुकीची मागणीसत्ताधारी पक्षातील नेतृत्वाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सार्वत्रिक निवडणूक घेण्याची मागणी विरोधी मजूर पक्षाने केली आहे. 'आम्हाला स्थिर सरकार देण्याची संधी दिली गेली पाहिजे. सत्ताधारी पक्षात अनागोंदी चालू आहे. त्यांचे देशाला नव्हे, पक्षाला प्रथम प्राधान्य आहे आणि हे चुकीचे आहे, अशी टीका मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी केली.

ऋषी सुनक यांचा इतिहास>> ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यास ते ब्रिटनमधील भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील. त्यांचे कुटुब १९६० च्या दशकात ब्रिटनमध्ये गेले.>> सुनक हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत.>> इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तीची मुलगी अक्षता मूर्तीशी त्यांचे लग्न झाले आहे.

देशासाठी काम करायचे आहेब्रिटन हा एक महान देश आहे; परंतु आम्ही गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत आहोत. म्हणूनच मी हुजूर पक्षाचा नेता आणि पुढचा पंतप्रधान होण्यासाठी उभा आहे. मला आमची अर्थव्यवस्था सुधारायची आहे, आमच्या पक्षाला एकत्र आणायचे आहे. देशासाठी काम करायचे आहे.- ऋषी सुनक 

टॅग्स :Londonलंडन