शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात 64 वर्षांनंतर हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार, समाजाची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:21 IST

1960 मध्ये या मंदिराची दुरवस्था झाली होती.

Pakistan News : स्वातंत्र्यापूर्वी आजच्या पाकिस्तानमध्ये अनेक हिंदूमंदिरे होती, पण हळुहळू या मंदिरांना नष्ट करण्यात आले. आता देशात मोजकीच मंदिरे असून, त्यातील बहुतांश जीर्ण झाली आहेत. अशातच, पाकिस्तान सरकारने पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक कोटी पाकिस्तानी रुपयांच्या बजेटची तरतूदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल 64 वर्षांनंतर पाकिस्तानात एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. 

पाकिस्तानी 'डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवर देखरेख करणारी संस्था इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) ने पंजाब प्रांतातील रावी नदीच्या पश्चिमेकडे स्थित नारोवाल शहरातील बावली साहिब मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आहे. या मंदिराची 1960 मध्ये दुरवस्था झाली होती. सध्या नारोवाल जिल्ह्यात एकही हिंदू मंदिर नाही, ज्यामुळे हिंदू समुदायाला आपापल्या घरातच धार्मिक विधी करावे लागतात किंवा त्यासाठी सियालकोट आणि लाहोरमधील मंदिरांमध्ये जावे लागते.

एकेकाळी येथे 45 मंदिरे होतीपाक धर्मस्थान समितीचे माजी अध्यक्ष रतन लाल आर्य म्हणाले की, बावली साहिब मंदिरावर ईटीपीबीच्या नियंत्रणामुळे ते मोडकळीस आले आणि नारोवालमधील 1453 हून अधिक हिंदूंना त्यांच्या प्रार्थनास्थळापासून वंचित राहावे लागले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर नारोवाल जिल्ह्यात 45 मंदिरे होती, परंतु ती सर्व दुरुस्तीअभावी मोडकळीस आली. पाक धर्मस्थान समिती गेल्या 20 वर्षांपासून बावली साहिब मंदिराच्या नूतनीकरणाची मागणी करत आहे. आता इतक्या वर्षांनंतर हिंदू समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने मंदिराच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत.

हेदेखील जाणून घ्यापाकिस्तानी सुप्रीम कोर्टाच्या 'वन मॅन कमिशन'चे अध्यक्ष शोएब सिद्दल आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य मंजूर मसीह यांनी या दुरुस्तीच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले की, बावली साहिब मंदिराच्या नूतनीकरणामुळे हिंदू समुदायाची दीर्घकाळची मागणी पूर्ण होईल आणि त्यांना पूजास्थळी धार्मिक विधी करण्याची परवानगी मिळेल. विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 75 लाखांहून अधिक हिंदू राहतात. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूTempleमंदिर