शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फिनलंडनंतर आता स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय; रशियाने दिला पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:09 IST

Sweden and Finland : रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, ही आणखी एक गंभीर चूक आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होतील.

मॉस्को : फिनलंडनंतर (Finlad) आता स्वीडन नाटो (Nato) लष्करी आघाडीत सामील होणार आहे. याववर रशियाने सोमवारी प्रतिक्रिया दिली असून, हा निर्णय गंभीर चूक असून रशिया त्याबाबत उपाययोजना करेल, असे म्हटले आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, ही आणखी एक गंभीर चूक आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होतील. रशियन वृत्तसंस्थांनी त्याचा हवाला देत म्हटले आहे की, यामुळे लष्करी तणावाची सामान्य पातळी वाढेल. 

या निर्णयामुळे दोन्ही देशांची सुरक्षा मजबूत होणार नाही आणि मॉस्को योग्य ती उपाययोजना करेल, असे सर्गेई रायबकोव्ह यांनी सांगितले. तसेच, आपण ते सोडू असा भ्रम ठेवू नये, असेही ते म्हणाले. फिनलंड आणि स्वीडन या दोन्ही देशांना रशियाकडून हल्ल्याचा धोका आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वत:चे रक्षण करण्यासाठी ते नाटोमध्ये सामील होण्यासाठी अनेक दशकांचे लष्करी अलाइनमेंट संपवण्यास तयार आहेत.

फिनलंडसोबत रशियाने 1,300-किलोमीटर (800 मैल) सीमा सामायिक केली आहे की ते 'परस्पर निर्णय' घेईल. यावर नाराजी व्यक्त करत रशियाने दोन्ही देशांना इशाराही दिला आहे. युरोपातील राजकारण आणि इतिहासाच्या दृष्टीने ही मोठी घटना म्हणता येईल. यानंतर, फिनलंड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील झाल्यानंतर नाटोची रशियाबरोबरची सीमा दुपटीने वाढेल.

काय आहे नाटो?नाटो ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना आहे, जी शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनच्या विस्ताराच्या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आली होती. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतरही ही संघटना केवळ टिकली नाही तर झपाट्याने विस्तारली. शीतयुद्धात सोव्हिएत युनियनच्या जवळ असलेले अनेक देश आता हळूहळू नाटोमध्ये सामील होऊ लागले. आता फिनलंड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे नाटोला बाल्टिक देशांचे संरक्षण करणे सोपे होईल. दुसरीकडे, बाल्टिक प्रदेशात नाटो आता कमकुवत नाही तर एक शक्तिशाली बनेल.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय