शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच पकडला 'जिवंत' कोरोना; होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 14:40 IST

China Coronavirus चा उपचार करताना महत्त्वाची मदत होणार

ठळक मुद्देकोरोना विषाणूची नेमकी रचना शोधण्यात शास्त्रज्ञांना यश कोरोनाच्या उपचारांत मोठी मदत होणारफ्रोजन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अ‍ॅनलिसिस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोनाचं छायाचित्र घेण्यात यश

पेइचिंग: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा फटका जगातल्या ८० देशांना बसला आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाच्या रचनेची नेमकी माहिती नसल्यानं त्यावर उपचार करणं कठीण जात आहे. कोरोनाचा विषाणू नेमका दिसतो कसा, याची माहिती मिळवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. चीनमधल्या शास्त्रज्ञांच्या एका पथकाला विषाणूची नेमकी रचना शोधण्यात यश मिळालं आहे. कोरोनाचा विषाणू कोशिकांमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी कोशिकांची स्थिती नेमकी कशी असते, याचं छायाचित्र मिळवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी विषाणूची रचना समजून घेणं आवश्यक होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून शास्त्रज्ञ यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना यश आल्यानं कोरोना विषाणूवरील लस तयार करण्यात मोठी मदत होणार आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण चीनमधल्या शेनजेन इथल्या शास्त्रज्ञांच्या एका पथकानं कोरोनाच्या विषाणूचा फोटो प्रसिद्ध केला आहे. 

फ्रोजन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अ‍ॅनलिसिस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोनाचं छायाचित्र घेण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वप्रथम विषाणूला निष्क्रीय करण्यात आलं. त्यानंतर त्याचं छायाचित्र टिपण्यात आलं. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं विषाणूचा जैविक नमुना सुरक्षित करण्यात आला. त्यामुळे विषाणू जिवंत असताना त्याची नेमकी रचना कशी होती, याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. कोरोनाचा विषाणू जिवंत असताना जसा दिसेल, तशीच रचना आम्ही पाहिल्याची माहिती संशोधन पथकाचे सदस्य आणि प्राध्यापक लिऊ चुआंग यांनी दिली. कोरोना विषाणू कोशिकांमध्ये कसा प्रवेश करतो, त्यामुळे कोशिकांवर कसा आणि काय परिणाम होतो, याची छायाचित्रं मिळवण्यातही शास्त्रज्ञांना यश आलं आहे. यासाठी शेनजेन नॅशनल क्लिनिकल मेडिकल रिसर्च सेंटर आणि सदर्न युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ काम करत होते.  

टॅग्स :corona virusकोरोना