शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डोकलामला प्रत्युत्तर :  चीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:38 IST

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेश व सिक्कीमचा एक दिवसाचा दौरा करून या भागाची हवाईपाहणी केली. चीन व भारत या दोन्ही देशांनी राजनैतिक वाटाघाटींनंतर डोकलाम सीमेजवळचा फौजफाटा २८ आॅगस्ट रोजी मागे घेतला. त्यानंतर, संरक्षणमंत्र्यांचा या भागातला हा पहिलाच दौरा होता.डोकलाम भागात २८ आॅगस्टनंतर चिंता वाढविणारी एकही घटना घडलेली नाही. उभयपक्षांत शांतता असली, तरी ट्रायजंक्शनपासून १२ किलोमीटर अंतरावर चीनने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुन्हा सुरू केले व त्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरू केली, असे वृत्त धडकल्यानंतर सीतारामन यांचा या भागातला प्रत्यक्ष पाहणी दौरा सूचक ठरला आहे. संरक्षण मंत्रालयानुसार डोकलाम भागात २८ आॅगस्टनंतर जैसे थे स्थिती आहे. संरक्षणमंत्र्यांनी या दौºयात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचीही भेट घेतली. सीमावर्ती भागात अग्रक्रमाने नवे रस्ते तयार करण्याची सरकारची रणनीती योग्य व आवश्यक आहे, असे या सूत्रांनी सांगीतले.

टॅग्स :Doklamडोकलामchinaचीन