लंडन : मेंदूतील लहरींचा वापर करुन एक नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, त्याच्या सहाय्याने टीव्ही वाहिन्या बदलण्यासाठी आता रिमोटची गरज नाही. मनात आले की चॅनल बदलेल असे संशोधकांचे म्हणणे आहे. लंडनमधील संशोधकांनी हे तंत्र विकसित केले असून, बीबीसीने हा प्रयोग करून पाहिला आहे. बीबीसीने मेंदूंच्या लहरीशी संपर्क साधणारा हेडसेट घेतला असून धिस प्लेस या लंडनमधील स्टुडीओबरोबर हा अनुभव घेतला आहे. मार्इंड कंट्रोल टीव्ही असे या प्रयोगाचे नाव आहे. मेंदूतील लहरीवर हे उपकरण चालते व मनाला हवा तो कार्यक्रम टीव्हीवर पाहता येतो. ट्रायल म्हणून बीबीसीच्या १० कर्मचाऱ्यानी या उपकरणाचा वापर केला, त्यानी हेउपकरण लावताच त्यांच्या मनाला येईल ते कार्यक्रम पाहता येतात याचा अनुभव घेतला. हा प्रयोग फारच सोपा आहे. अपंग व्यक्तींना रिमोटचा वापर करता येत नसेल त्यांच्यासाठी हे उपकरण फारच लाभदायक ठरेल असे बीबीसीचे सायरस हान यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
रिमोट कंट्रोल तुमच्या मनात!
By admin | Updated: June 24, 2015 02:06 IST