शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Recession in Britain:  ब्रिटनमध्ये मंदी जाहीर; ऋषी सुनक सरकारची घोषणा, आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 11:17 IST

जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यास पाठिंबा दिला.

एकेकाळी जगावर अधिराज्य गाजविणारा ब्रिटन देश आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. येत्या काही दिवसांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटीश सरकार या मंदीचा मारा झेलण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पावले उचलणार असल्याची घोषणा केली आहे. सुनक यांच्या सरकारने 5500 कोटी पौंडची आर्थिक योजना सादर केली आहे.

गुरुवारीच अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सरकारचा आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये करांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा कंपन्यांवरील विंडफॉल टॅक्स 25 टक्क्यांवरून 35 टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक जनरेटरवर 45 टक्के तात्पुरता कर लावण्यात आला आहे. आता वार्षिक 1.25 लाख पौंड कमावणारे लोकही सर्वोच्च कराच्या कक्षेत येतील. तसेच 2025 पासून इलेक्ट्रिक वाहनांवर उत्पादन शुल्क लावले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

जेरेमी हंट यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ऑटम स्टेटमेंट सादर केले. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यास पाठिंबा दिला. ब्रिटनमधील महागाई आटोक्यात येत नाहीय. त्यामुळे सरकारने कराचे दर वाढवले ​​आहेत. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मिनी बजेटमुळे ब्रिटीश सरकारला धक्का बसला होता. त्यातून सावरण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पासोबत स्वतंत्र युनिट OBR (ऑफिस फॉर बजेट रिस्पॉन्सिबिलिटी) चा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे इंधनासह अन्य वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. 2024 पर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

संपूर्ण जग ऊर्जा आणि महागाईच्या संकटाचा सामना करत आहे. स्थैर्य, विकास आणि सार्वजनिक सेवा या योजनेमुळे आपण मंदीचा सामना करू शकू, असे हंट म्हणाले. ब्रिटनमध्ये वाढत्या महागाईमुळे सरकारसह सर्वसामान्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात ११.१ टक्क्यांवर पोहोचला असून, ४१ वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1981 नंतरचा हा सर्वाधिक महागाई दर आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर १०.१ टक्के होता.

 

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकEnglandइंग्लंड