शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-मेल’चे जनक रेमण्ड यांचे निधन

By admin | Updated: March 7, 2016 23:17 IST

ई-मेल’ची ५७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

न्यूयॉर्क : आज जगात खासगी अथवा व्यावसायिक संदेशवहनासाठी सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ‘ई-मेल’ची ५७ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवून अत्यंत वेगवान अशा क्रांतिकारी संदेशवहन पर्वाचा मार्ग प्रशस्त करणारे प्रतिभावंत तंत्रज्ञ रेमण्ड टॉमलिन्सन यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.लिंकन, मॅसॅच्युसेट््स येथील राहत्या घरी रे टॉमलिन्सन यांचे शुक्रवारी, बहुधा हृदयविकाराने, निधन झाले असावे, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांनी दिले. त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. रेमण्ड सध्या जेथे नोकरीस होते त्या रेथेआॅन कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. आजच्या स्वरूपातील ई-मेलची मुहूर्तमेढ रेमण्ड टॉमलिन्सन यांनी १९७१ मध्ये रोवण्यापूर्वीही संगणकांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक संदेशांची देवाणघेवाण करण्याचे अगदी प्राथमिक स्वरूपातील तंत्र अस्तित्वात होते. त्ंयावेळी व्यक्तिगत संगणक नव्हते. त्यामुळे एका मर्यादित नेटवर्कमध्ये अनेकांना सामायिक स्वरूपाचा संदेश पाठविणे शक्य होत असे. रेमण्ड यांनी हे तंत्र आणखी प्रगत केले व जगाच्या पाठीवरील कोट्यवधी लोकांना गोपनीय पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर संदेशाची देवाणघेवाण करणे शक्य झाले. (वृत्तसंस्था)> ‘@’ ची देणगीप्रत्येकाचा ई-मेल अ‍ॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये ‘@’ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते.> जगाच्या संदेशवहन क्षेत्रात रेमण्ड टॉमलिन्सन यांनी क्रांती घडवून आणली. एवढी महान कामगिरी करूनही ते नेहमीच विनम्र, दयाळू आणि उमदादिल राहिले.-माईक डोबल, प्रवक्ते, रेथेआॅन कंपनीरेमण्ड यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे.-व्हिंटन सेर्फ, इंटरनेटचे एक प्रणेतेरे टॉमलिन्सन,ई-मेलचा शोध लावल्याबद्दल व ‘@’ हे चिन्ह जगाच्या नकाशावर आणल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.-जीमेलची टष्ट्वीटरवर श्रद्धांजली