शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:40 IST

भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत. 

Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत अयोध्येत आज रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. मोठ-मोठ्या शहरांपासून अगदी गावखेड्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशासह जगभरात चर्चा रंगत असताना थायलंड येथीलही अयोध्येसारखंच नाव असलेलं एक ऐतिहासिक शहर चर्चेत आलं आहे.

थायलंड येथील अयुथ्या हे शहर १३५० मध्ये वसवण्यात आलं होतं. हे शहर कधीकाळी एका विशाल साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जात. अयुथ्या शहर हे  बँकॉकपासून ७० किलीमीटर अंतरावर आहे. भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत.  भारताच्या प्राचीन संस्कृतीचा दक्षिण पूर्व आशियावर मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की, जेव्हा अयुथ्याची स्थापना झाली तेव्हा रामामण थायलंडपर्यंत पोहोचलं होतं. थायलंडमध्ये रामायण हे रमाकिएन नावानं ओळखलं जातं. थायलंडचे लोक राजाला भगवान विष्णूचा अवतार मानतात. त्यामुळेच तिथं राजाला रामा-१, रामा-२ अशा नावाने ओळखलं जातं. थायलंडमध्ये संस्कृतसह पाली भाषेचाही प्रभाव पाहायला मिळतो. 

दरम्यान, भारत आणि थायलंडच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना ७७ वर्ष पूर्ण होत असली तरी या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध मात्र अनेक शतकांचे आहेत. १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अयुथ्या हे एक समृद्ध शहर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र १७६७ मध्ये बर्माने या शहरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अयुथ्या शहर उद्धवस्त झालं. परिणामी या शहरात अनेक मूर्ती आणि इमारतीचा सांगाडा आज पाहायला मिळतो.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरThailandथायलंडAyodhyaअयोध्या