शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामलला मंदिरात विराजमान, भारतात जल्लोष; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:54 IST

राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची फक्त भारतातच चर्चा नसून जगभरातील अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही राम मंदिराबाबत बोललं जात आहे.

Ram Mandir  News: गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतात प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी प्रेम आणि सन्मानाने विराजमान झाले आहेत. हीच भावना देशभरात असल्याने हा सोहळा दिवाळी म्हणून साजरा करण्यात येत आहे. देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली रामललाची मूर्ती आज दुपारी मंदिरात स्थापन होणाऱ्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात आली आहे. राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेची फक्त भारतातच चर्चा नसून जगभरातील अनेक देशांप्रमाणेच पाकिस्तानातही राम मंदिराबाबत बोललं जात आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानी माध्यमांत अनेक बातम्या आणि लेख छापण्यात आले आहेत.

पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या 'द डॉन'मधील एका लेखात म्हटलं आहे की, 'ज्या जागेवर पाच शतकांपासून बाबरी मशीद होती, तिथं आता राम मंदिर उभारलं जात आहे. राम मंदिरच्या चारही बाजूने व्हॅटिक सिटीसारखं शहर उभं राहणार आहे.'

दुसरीकडे 'पाकिस्तान टुडे' या दैनिकानेही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत लिहिलं आहे की, "सोमवारी अशा जागेवर भव्य मंदिराचं उद्घाटन होतंय ज्या जागेला लाखो भारतीय रामाचं जन्मस्थळ मानतात. नरेंद्र मोदींच्या भाजप या हिंदुत्ववादी पक्षाने राम मंदिराचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्यासाठी हा नेहमीच एक राजकीय मुद्दा राहिलेला आहे. याच मुद्द्याने भाजपला सत्तेत येण्यास मदत केली आहे."

दरम्यान, "भारतात काही महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचाराची सुरुवात म्हणूनही राम मंदिर सोहळ्याकडे पाहिलं जात आहे," असा उल्लेख 'पाकिस्तान टुडे' दैनिकाने आपल्या बातमीत केला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान