शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "द्वेषाच्या बाजारात, प्रेमाचं दुकान..."; अमेरिकेत राहुल गांधींना थांबवावं लागलं भाषण, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 10:54 IST

Rahul Gandhi : राहुल यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते अमेरिकेतील तीन शहरांच्या दौऱ्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले, तेथे भारतीय समाजातील महिलांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधला. राहुल यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. भाषणादरम्यान काही लोकांनी घोषणाबाजी केल्याने त्यांना काही आपलं काळ भाषण थांबवावं लागलं.

राहुल सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित करत होते. यावेळी काही लोकांनी घोषणाबाजी करण्यास सुरू केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या घोषणा दिल्या हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत नसले तरी एक व्यक्ती 'इंदिरा गांधी...' म्हणताना ऐकू येत आहे. घोषणाबाजी सुरू असल्यामुळे राहुल गांधींना आपले भाषण थांबवावे लागले. जेव्हा मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरू झाली तेव्हा राहुल गांधी म्हणाले, "द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान..." यानंतर सभागृहात ‘भारत जोडो’च्या घोषणा द्यायला लोकांनी सुरुवात केली आणि राहुल गांधी पुन्हा बोलू लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"ब्रह्मांडात काय चाललंय? हे मोदीजी देवालाही समजावून सांगू शकतात"

 राहुल गांधी म्हणाले की, "काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची सामान्य साधने (जसे की जाहीर सभा, लोकांशी बोलणे, रॅली) काम करत नाहीत हे आपण पाहिलं होतं. राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजपा आणि आरएसएसचे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. एजन्सी वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतात राजकारण करणं आता सोपं राहिलेलं नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही प्रवास करण्याचं ठरवलं."

"मला वाटतं जर पंतप्रधान मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केलं आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना सर्वकाही माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे. कारण जर तुम्हाला कोणाचे ऐकायचे नसेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच कळू शकत नाही" असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिका