शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; भारतात निघून जा म्हणत बेशुद्ध होईपर्यंत मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:35 IST

ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Australia Indian Student Attack: ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात शनिवारी एका भारतीय विद्यार्थ्यावर क्रूर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. सेंट्रल अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. पाच जणांच्या गटाने हा केला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे आणि उर्वरितांचा शोध सुरू आहे. भारतीय विद्यार्थ्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरणप्रीत सिंग त्याच्या पत्नीसोबत शहरातील लाईट शो पाहण्यासाठी कारमधून बाहेर निघाला होता. यादरम्यान, रात्री ९ वाजता किंटोर अव्हेन्यूजवळ कार पार्किंगवरून त्याचा स्थानिकांशी वाद झाला. त्यांनी चरणप्रीतला वांशिक शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हिंसक हल्ला केला. चरणप्रीत सिंगवर धारदार वस्तूंनी हल्ला करण्यात आला. हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ज्यामध्ये हल्लेखोर अपशब्द वापरताना दिसत आहेत. चरणप्रीत सिंग तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोर त्याला लाथा आणि ठोसे मारताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये पाच जण चरणप्रीतच्या चेहऱ्यावर आणि पोटावर ठोसे आणि लाथा मारताना दिसत आहेत. त्याची पत्नी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती. हल्लेखोरांच्या हातात धारदार वस्तूही होत्या. हल्ल्यानंतर आरोपी त्यांच्या गाडीत बसले आणि चरणप्रीतला बेशुद्ध अवस्थेत सोडून गेले. चरणप्रीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रॉयल अॅडलेड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

"ते मला भारतीयांनो पळून जा असं म्हटलं आणि नंतर मला लाथा आणि मुक्का मारायला सुरुवात केली. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली," असं चरणप्रीतने सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी, एनफिल्डमध्ये एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत मागितली आहे. या हल्ल्यामुळे अ‍ॅडलेडमधील भारतीय समुदाय संतप्त झाला आहे. चरणप्रीतच्या समर्थनार्थ अनेक लोक एकत्र आले आहेत आणि त्यांनी या हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, १९ जुलै रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिनमधील टॅलाघ्ट परिसरात एका ४० वर्षीय भारतीय नागरिकावर हिंसक हल्ला करण्यात आला. पार्कहिल रोडवर हल्लेखोरांच्या एका गटाने पीडितेला घेरले. यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. त्यांनी भारतीय व्यक्तीला मारहाण करत त्याचे कपडे फाडले आणि त्याला नग्न केले. त्याचे बूट, फोन आणि बँक कार्ड हिसकावून घेतले.