शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

केजीबी एजंट ते राष्ट्राध्यक्ष, व्लादिमिर पुतीन यांची चौथी टर्म सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 15:39 IST

1999 साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळेस त्यांचे वय 47 वर्षे होते.

मॉस्को- गुप्तहेर संघटना केजीबीपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि प्रदीर्घकाळ रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहाणाऱ्या व्लादिमिर पुतीन यांच्या कार्यकाळाची चौथी टर्म सुरु झाली आहे. 18 वर्षांपुर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. आता आणखी 6 वर्षे त्यांना यापदावर राहाता येणार आहे. मॉस्को येथे ग्रँड क्रेमलिन पॅलेस येथे झालेल्या सरकारी कार्यक्रमात त्यांनी चौथ्या कार्यकाळाची सूत्रे स्वीकारली.  ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील.

स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. अध्यक्षपदासाठी निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात सात उमेदवार होते. पुतीन यांचे कडवे टीकाकार अलेक्झी नवल्नी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.

 

पुतीन यांना कार्यकाळासाठी निवडून येताना 76 टक्के इतकी भरघोस मते मिळाली त्यामुळे तेच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाले. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पावेल ग्रुडिनिन यांना 11.8 टक्के मते मिळाली तर व्लादिमिर झिरिनोवस्की यांना 5.6 टक्के मते मिळाली.सरकारी कार्यक्रमानंतर पुतीन म्हणाले, रशियाच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. शांतता आणि संपन्न भविष्यासाठी तसेच प्रत्येक रशियन कुटुंबाच्या कल्याणासाठी मी काम करेन. व्लादिमिर पुतीन पुर्वी केजीबीचे एजंट होते. त्यानंतर 1999 साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळेस त्यांचे वय 47 वर्षे होते. पुतीन यांच्या कार्यकाळामध्ये काही मोठे निर्णयही घेण्यात आले. युक्रेनकडून क्रायमिया हिसकावण्यामध्ये ते यशस्वी झाले तसेच सीरियाच्या बशर अल असाद यांच्यामागे ठामपणे उभे राहून त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. अमेरिका, इस्रायल आणि पर्यायाने संपूर्ण युरोपसाठी डोकेदुखीचा प्रश्न म्हणून सीरियाकडे पाहिले जाते पण पुतीन यांनी आपल्या भूमिकेत तसूभरही बदल केला नाही.

दीर्घकाळ सत्तेत राहाणारे जगातील इतर नेते

क्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळत होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली.सध्या दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते-इक्वोटोरियल गिनी- सध्या सर्वाधीक काळ अध्यक्षपदावर राहिलेले म्हणून तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचं नाव घेतलं जातं. ते ३८ वर्षे सत्तेत आहेत. १९७९ साली त्यांनी आपल्या काकांना पदच्युत करुन सत्ता मिळवली.कॅमेरुन- अध्यक्ष- पॉल बिया ३५ वर्षेकाँगो- अध्यक्ष डेनिस सासोऊ ३४ वर्षे (यामध्ये ५ वर्षांचा उपराष्ट्रपतीपदाचा कालखंड मोजलेला नाही.)कंबोडिया- पंतप्रधान हुन सेन ३३ वर्षेयुगांडा- अध्यक्ष योवेरी मुसेवेनी- ३२ वर्षेइराण- सर्वोच्च नेते अयातोल्ला खोमेनी २९ वर्षेसुदान- अध्यक्ष ओमर अल बशीर २८ वर्षेकजाखस्तान- अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव २८ वर्षेचाड- अध्यक्ष इद्रिस डेबी २७ वर्षेताजिकिस्तान- अध्यक्ष एमोमाली राखमोन २५ वर्षेइरिट्रिया- अध्यक्ष इसायस  अफ्वेर्की २४ वर्षे 

टॅग्स :russiaरशियाPresidentराष्ट्राध्यक्षInternationalआंतरराष्ट्रीय