मागील काही वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाने आता युक्रेनवर आणखी हल्ले वाढवले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फटकारले. ट्रम्प म्हणाले की, पुतिन युक्रेनसोबतच्या शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यात अडथळे निर्माण करत आहेत आणि सतत लष्करी कारवाई करत आहेत.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत लिहिले की, "व्लादिमीर पुतिन यांना हे समजत नाहीये की जर मी तिथे नसतो तर आतापर्यंत रशियामध्ये खूप वाईट गोष्टी घडल्या असत्या. ते आगीशी खेळत आहेत.
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. रशियाच्या हल्ल्यात, युक्रेनियन शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे, यामध्ये सामान्य नागरिक देखील मारले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे.
ते विनाकारण अनेक लोकांना मारत आहेत - ट्रम्प
एक दिवस आधी, ट्रम्प यांनी पुतिन यांच्यावर नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "ते विनाकारण अनेक लोकांना मारत आहेत आणि मी फक्त सैनिकांबद्दल बोलत नाहीये. युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत, तेही विनाकारण. मी नेहमीच म्हटले आहे की त्यांना संपूर्ण युक्रेन देश हवा आहे, फक्त त्यांचा एक भाग नाही, आणि कदाचित ते आता खरे ठरत आहे. पण जर त्यांनी असे केले तर ते रशियाच्या पतनाची सुरुवात असेल, असंही ट्रम्प म्हणाले.