शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतील मराठीजनांकडून ‘लोकमत’च्या पाठीवर थाप, दीपोत्सवाच्या विक्रमाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 20:47 IST

माणूस कितीही दूर असला तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी लोकमतचे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून लोकमतच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली. 

दुबई, दि. 21 - माणूस कितीही दूर असला तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी लोकमतचे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून लोकमतच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली. नोकरी-व्यवसायानिमित्त देश आणि गाव सोडलेली लाखो माणसे सध्या दुबईमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंच रोवत आहेत. दुबईतील व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल यांच्या नेतृत्वात दुबईमध्ये स्थिरावलेल्या मराठीजनांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. लोकमतचा चमू दुबई भेटीवर आल्याचे कळताच ह.भ.प. अ‍ॅड. जयवंतराव बोधले महाराज यांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी एकमेकांशी संपर्क साधून लोकमत चमू आणि दुबईतील मराठीजन एकत्र आले. यानिमित्त शुक्ल यांच्या दुबईतील कार्यालयाच्या सभागृहात १८ सप्टेंबरच्या सायंकाळी एक स्नेहसोहळा पार पडला. या समारंभात पुन्हा मराठी माती भावनांनी पुलकित झाली आणि आठवणींच्या सुगंधाने दरवळली.लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट वसंत आवारे यांच्यासह वरिष्ठ उपसंपादक गोपालकृष्ण मांडवकर, बार्शीचे तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे तथा व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल, दासबोध अभ्यास वर्गाचे प्रमुख डॉ. निमखेडकर, इ.वाय.चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तथा महाराष्ट मंडळ दुबईचे अध्यक्ष राहुल गोखले, एसक्यूसीचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर तथा गल्फ महाराष्ट बिझिनेस फर्मचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना राजा माने यांनी दुबईत स्थिरावूनही आपली संस्कृती जपत महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मराठीजनांचे आपल्या मनोगतातून स्वागत केले. ते म्हणाले, सातासमुद्रापारही आपल्या संस्कृतीचा झेंडा उंच राखत मराठी माणसांची मान ताठ ठेवणारी ही सर्व कर्तबगार मंडळी ख-या अर्थाने महाराष्ट्राचे ब्रॅण्ड अ‍म्बेसॅडर आहेत. दुबईसारख्या प्रगत शहरात राहूनही तिथे आपले मराठीपण जपत मराठी मनाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी ही मंडळी करीत असलेल्या प्रयत्नांचे माने यांनी कौतुक केले. लोकमतच्या वतीने चालविल्या जाणा-या सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी आपल्या मनोगतातून कल्पना दिली.लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट वसंत आवारे म्हणाले, लोकमत हा महाराष्टाचा मानबिंदू आहे, तसे येथील दुबईकरही महाराष्टाचे मानबिंदू आहेत. आपल्या कर्तबगारीच्या बळावर दुबईतील समाजकारणात, व्यापारात आणि अर्थकारणात अधोरेखित व्हावे, असे त्यांचे कार्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही या कर्तबगारांचा अभिमान आहे. लोकमतच्या वतीने काढल्या जाणा-या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. एक लाख प्रतींच्या खपाचा विक्रम नोंदविणारे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हातून मिळालेला लोकमतचा दीपोत्सव म्हणजे महाराष्टच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्हॅल्यूचे प्रोजेक्ट्स आणि बिझिनेस डायरेक्टर व्ही. एम. राऊत, मोवार्ड एनर्जीचे ग्रुप फायनान्स को-आर्डिनेटर अजय भांगे, फेम्को इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट मॅनेजर संदीप गुप्ता, अभी इंप्टेक इंटरनॅशनलचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर नितीन सास्तकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.दीपोत्सवाच्या विक्रमाचे कौतुकयावेळी उपस्थित दुबईतील मराठीजनांनी दीपोत्सवाच्या विक्रमाचे कौतुक केले. या अंकामध्ये नेमके काय असते याची उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचे यावेळी जाणवले. गेल्या वेळी ३६ देशांमध्ये राहणाºया मराठी माणसांच्या हातापर्यंत दीपोत्सव पोहोचला असल्याने यावेळी दुबईमध्येही दीपोत्सवाचे स्वागत आम्ही करू, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. दासबोध आणि संतपंचक...ही मंडळी मागील अनेक वर्षांपासून मुंबईत दासबोध अभ्यास वर्ग चालवितात. दासबोधाच्या अभ्यासक असलेल्या महेश शुक्ल यांच्या मातोश्री शीलवंती श्रीधर शुक्ल या तेथील दासबोध अभ्यास वर्गाच्या आधारस्तंभ आहेत. दुबईतील मराठीजन न चुकता या वर्गाला जातात. महाराष्टाच्या संतपरंपरेच्या संतपंचकातील सर्व संतांची जयंती-पुण्यतिथीही ही मंडळी पार पाडतात. यंदा गणेशोत्सवही त्यांनी धूमधडाक्यात साजरा केला. सर्व तिथी, सण, उत्सवांची आठवणीने माहिती ठेवून आपले मराठमोळेपण सातासमुद्रापल्याडही ते जोपासतात. महेश शुक्ल आणि त्यांच्या पत्नी ज्योतीताई यांचा या सर्व उपक्रमांत पुढाकार असतो.